शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील रिफायनरीचे तीन तुकडे; एक युनिट विदर्भात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 08:05 IST

चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले श्री पुरी यांच्यासमोर वेदने विदर्भात रिफायनरी प्रकल्प उभारण्याविषयी सादरीकरण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोकणातील रत्नागिरीत होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्पाचे त्रिभाजन करून त्यापैकी एक युनिट विदर्भात उभारले जाऊ शकेल, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी विदर्भ इकॉनाॅमिक डेव्हलपेंट कौन्सिल (वेद)च्या शिष्टमंडळाशी बाेलताना दिले. परिणामी, बारसू येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला नवे वळण मिळाले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले श्री पुरी यांच्यासमोर वेदने विदर्भात रिफायनरी प्रकल्प उभारण्याविषयी सादरीकरण केले. अंदाजे चार लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पाची क्षमता वर्षाला ६० दशलक्ष टन (एमटीपीए) आहे. स्थानिक पातळीवर होणारा विरोध लक्षात घेता त्या प्रकल्पाचे प्रत्येकी २० एमटीपीए क्षमतेचे तीन भाग करून त्यापैकी प्रत्येकी एक युनिट रत्नागिरी व नागपूर येथे उभारण्याबाबत विचार होऊ शकेल, असे ना. पुरी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी वेदचे  कोषाध्यक्ष नवीन मालेकर, जे. एस. साळवे, चंद्रपूर एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगटा उपस्थित होते.

विदर्भात उद्योगांचा अभाव असला तरी कोळसा खाणी व उद्योगपूरक संसाधनांची मोठी उपलब्धता आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प विदर्भात उभारणे कसे शक्य आहे, यासंदर्भात आम्ही सखोल अभ्यास करून केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यासमोर सादरीकरण केले. विदर्भाची मौलिकता लक्षात घेऊन रिफायनरी प्रकल्प विदर्भात उभारण्याची ग्वाही आम्हाला दिली.     - प्रदीप माहेश्वरी, उपाध्यक्ष, विदर्भ इकॉनाॅमिक डेव्हलपेंट कौन्सिल (वेद), नागपूर

२५ हजार रोजगार शक्य विदर्भात २० एमटीपीए क्षमतेचा रिफायनरी प्रकल्प उभारल्यास सुमारे दीड लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. ही गुंतवणूक विदर्भाच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहे. रिफायनरी प्रकल्पामुळे २५ हजार व्यक्तींना थेट, तर एक ते दीड लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. वेदने २०२१ मध्ये प्रकल्पाबाबत तत्कालीन पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रकल्प अहवाल व निवेदन  सादर केले होते. त्याच्या प्रती ना. पुरी यांना देत जुन्या प्रस्तावाचे स्मरण केले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरRatnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प