घराची भिंत कोसळून बापलेकासह तिघे ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 15:20 IST2018-06-05T15:20:56+5:302018-06-05T15:20:56+5:30
रात्री झालेल्या वादळी पावसाने घराचे कोसळलेले छप्पर काढण्याचे काम करीत असताना अचानक भिंत कोसळली. या घटनेत बापलेकासह तिघेजण ठार झाले

घराची भिंत कोसळून बापलेकासह तिघे ठार, एक जखमी
चंद्रपूर : रात्री झालेल्या वादळी पावसाने घराचे कोसळलेले छप्पर काढण्याचे काम करीत असताना अचानक भिंत कोसळली. या घटनेत बापलेकासह तिघेजण ठार झाले. ही दुर्दैवी घटना मंगळवारी राजुरा तालुक्यातील पंचाळा या गावात सकाळी घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे. बापूजी वडस्कर (67)' धनराज वडस्कर (40) व चंद्रकांत जयपूरकर (37) अशी मृतकांची नावे आहेत. विठ्ठल वडस्कर (37) हे जखमी आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात रात्री 12 वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. काही भागात वादळी पाऊस झाला. यामध्ये पंचाळा येथील बापूजी वडस्कर यांच्या घराचे छप्पर कोसळले. आज सकाळी हे छप्पर काढण्यासाठी चंद्रकांतला बोलाविले होते. बापूजी, धनराज, चंद्रकांत व विठ्ठल हे चौघेही छप्पर बाजूला करीत असताना रात्री झालेल्या पावसात भिजलेली भिंत अचानक कोसळली. भिंतीच्या मलब्याखाली चौघेही दबले. यात तिघांचा मृत्यू झाला. घटनेची वार्ता पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत तिघांचा प्राणज्योत मालवली होती.