त्या ग्रामपंचायत सदस्याकडून तीन जीवंत काडतूस जप्त
By Admin | Updated: April 19, 2017 00:38 IST2017-04-19T00:38:09+5:302017-04-19T00:38:09+5:30
पोलिसांनी संवेदनशील नकोडा गावातील ग्रामपंचायत सदस्याकडून मंगळवारी तीन जीवंत काडतूस व बाऊजर आज जप्त केले.

त्या ग्रामपंचायत सदस्याकडून तीन जीवंत काडतूस जप्त
घुग्घुस : पोलिसांनी संवेदनशील नकोडा गावातील ग्रामपंचायत सदस्याकडून मंगळवारी तीन जीवंत काडतूस व बाऊजर आज जप्त केले. न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मागील अनेक वषार्पासून गाव क्षेत्रात हाणामाऱ्या, गोळीबारी व उपसरपंचाचा खून, जिवे मारण्याचा प्रयत्न अशा घटना घडल्यामुळे हे गाव अतिसवेंदनशीेल म्हणून गणले जाते. सोमवारी सायंकाळी गुप्त माहितीवरून नकोडा ग्रामपंचायत सदस्य आनंद दयाळ झाडे यांच्या घराची झडती घेतली असता पिस्तूल (देशी कट्टा) आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले आहे. हा कट्टा हा सहा महिन्यापूर्वी १५ हजारात खरेदी केला आहे. मात्र ज्या व्यक्तीकडून खरेदी केला, त्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोपीने पोलीस तपासात दिली. त्यानंतर त्याने पोलिसांना तीन जीवंत काडतूस व बाऊझर दिले. पुढील तपास छत्रपती चिडे करीत आहेत. (वार्ताहर)