शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार रस्त्याच्या खाली उलटली; माय-लेकी जागीच ठार, वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 12:30 IST

पिंपळनेरी-खापरी मार्गावर तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा भिषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला असून उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देदोन गंभीर जखमी : पिंपळनेरी-खापरी मार्गावरील घटना

चंद्रपूर : नातेवाईकाच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी कारने जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या खाली पलटली. या अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला तर, उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला असून  दोनजण जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमरास पिंपळनेरी-खापरी मार्गावर घडली.

सायत्रा मोतीराम मेश्राम (६५) व कमल चुनारकर (४५, दोघीही रा. खापरी), मोतीराम मेश्राम (७०, रा. खापरी) अशी मृतांची नावे आहेत. तर, उत्तम चुनारकर (४५, रा. चंद्रपूर) व अंकित राजू मेश्राम (वय १०, रा. खापरी) अशी जखमींची नावे आहेत.

खापरी येथील मेश्राम व चुनारकर यांचे कुटुंब कारने तालुक्यातीलच सरडपार येथे नातेवाईकाच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान, पिंपळनेरी-खापरी मार्गावर कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या खाली उतरून पलटली. यात सायत्रा मेश्राम व कमल चुनारकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी चंद्रपुरात हलविण्यात आले. मात्र, मोतीराम मेश्राम यांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. इतर दोन जखमींवर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. विशेष म्हणजे, पिंपळनेरी-खापरी मार्गाचे बांधकाम सुरू आहे. अशातच कार वेगात असल्याने अपघात झाला. या घटनेचा पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू