त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपट महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:36 IST2017-02-23T00:36:00+5:302017-02-23T00:36:00+5:30
२४ फेब्रुवारीपासून चंद्रपुरात प्रारंभ होत असलेल्या त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपट महोत्सवाला भारतीय चित्रपट स्ृष्टीतील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत प्रारंभ होत आहे.

त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपट महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ
माईक पांडे, नागराज मंजुळे येणार : ५० आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश
चंद्रपूर : २४ फेब्रुवारीपासून चंद्रपुरात प्रारंभ होत असलेल्या त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपट महोत्सवाला भारतीय चित्रपट स्ृष्टीतील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत प्रारंभ होत आहे. आॅस्कर विजेते माईक पांडे, चित्रपट निर्माते-निर्देशक किरण शांताराम, सैराट चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत २४ तारखेला सायंकाळी ५ वाजता स्थानिक राजीव गांधी अभियांोित्रकी महाविद्यालयात या महोत्सवाचे उद्घाटन होत आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अध्यक्षस्थानी असतील. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल, माजी न्यायाधीश विकास सिरपुरकर यांची उपस्थिती या महोत्सवात राहणार आहे. निर्देशक चित्रपट विभाग मनिष देसाई तथा माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांतराम पोटदुखे या महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या संयुक्त विद्यामने तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जगभरातील उत्कृष्ट अशा ३३ माहिती चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जेदार ‘आस्कर’ पुरस्कारांनी सन्मानित अनेक माहिती चित्रपटांचा या सुचित समावेश आहे.
या महोत्सवाचे औचित्य साधून चंद्रपूर आणि परिसरातील चित्रीकरण क्षेत्रात संधी शोधणाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण या महोत्सवादरम्यान दिले जाणार आहे. ५० युवक-युवतींना या संदर्भात विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. २५ तारखेला माईक पांडे यांचा दुपारी २०३० वाजता सर्वांसाठी मास्टर क्लास होणार आहे. (नगर प्रतिनिधी)