खुनातील तीन आरोपी जेरबंद
By Admin | Updated: November 11, 2015 00:37 IST2015-11-11T00:37:00+5:302015-11-11T00:37:00+5:30
सचिन दुसावार नामक मित्राची पट्ट्याने गळा दाबून हत्त्या करणाऱ्या तिघांना रामनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

खुनातील तीन आरोपी जेरबंद
सचिन दुसावार : मित्रांनीच गळा दाबून केली हत्या
चंद्रपूर : सचिन दुसावार नामक मित्राची पट्ट्याने गळा दाबून हत्त्या करणाऱ्या तिघांना रामनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दौलत ऊर्फ गुड्डू रमेश साव (२०), अयुब अबू शेख (२३) आणि सूरज दुर्गे अशी आरोपींची नावे असून या खूनप्रकरणातील एक अल्पवयीन आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व आरोपी स्थानिक रमाबाईनगरमधील अष्टभूजा वार्डातील रहिवासी आहेत. २५ वर्षीय मृत सचिन २५ नाव्हेंबरला दुपारी जेवण करून घरातून बाहेर पडला. नंतर तो परतलाच नाही. दरम्यान, ७ नोव्हेंबरला मनपाच्या कचरा डेपोलगत सचिनच्या मृतदेह पडून असल्याची माहिती त्याच्याच एका मित्राने सचिनच्या वडिलांना दिली. या प्रकरणी रामनगर पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान, मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. यातील एक आरोपी फरार आहे. (प्रतिनिधी)