तीन फरार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:26 IST2021-07-26T04:26:17+5:302021-07-26T04:26:17+5:30

बल्लारपूर : महाराणा प्रताप वॉर्डातील सुभाष चौकात विशेष ऊर्फ संदीप बोग्गा ऊर्फ सुरेश दवंडेवार यांच्यावर तलवारीने हल्ला करून पळ ...

Three absconding accused arrested | तीन फरार आरोपींना अटक

तीन फरार आरोपींना अटक

बल्लारपूर : महाराणा प्रताप वॉर्डातील सुभाष चौकात विशेष ऊर्फ संदीप बोग्गा ऊर्फ सुरेश दवंडेवार यांच्यावर तलवारीने हल्ला करून पळ काढणाऱ्या विशेष ऊर्फ विशू मोगली कोंडावार यास त्वरित अटक केली. परंतु तीन आरोपी फरार होते. त्या तीन आरोपींना बल्लारपूर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली आहे. घटनेमध्ये वापरण्यात आलेल्या तलवारीचा शोध पोलीस घेत आहेत.

घटनेमधील गंभीर जखमी यांच्यावर नागपूरला उपचार सुरू आहेत. टेकडी परिसरात महाराणा प्रताप वॉर्डात तलवारी हातात घेऊन युवकांचा धिंगाणा करणे नित्याचे झाले आहे. शुक्रवारी जुन्या वैमनस्यामुळे वाद निर्माण होऊन युवकांनी तलवारी हातात घेऊन संदीप बोग्गावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील आपल्या चमूसह तत्काळ पोहोचले नसते तर वाद चिघळला असता. परिस्थितीवर नियंत्रण करून तत्काळ एका आरोपीस अटक करण्यात आली व फरार आरोपी मोहम्मद रईस मोहम्मद हफीज (२४), चंदू हिबारे (२२), विनोद ऊर्फ चंटी मोगली कोंडावार (२७) यांना शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद रासकर करीत आहेत.

Web Title: Three absconding accused arrested