असहकार आंदोलन करणाऱ्यांना धमक्या
By Admin | Updated: July 21, 2014 23:47 IST2014-07-21T23:47:44+5:302014-07-21T23:47:44+5:30
राज्य पशुव्यवसाय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या असहकार आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी यांनी सहभाग घेऊन अहवाल बंद व असहकार आंदोलन

असहकार आंदोलन करणाऱ्यांना धमक्या
चंद्रपूर : राज्य पशुव्यवसाय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या असहकार आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी यांनी सहभाग घेऊन अहवाल बंद व असहकार आंदोलन १० जून पासून सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी अहवाल बंद केल्याने अधिकाऱ्यांचे कामाचे आकडे वरिष्ठांकडे जाणे बंद आहे. त्यामुळे पशुसंवर्धन अधिकारी प्रत्येक तालुक्यात बैठका घेऊन कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी देत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
जिल्ह्यातील एल.डी.ओ. पेक्षा जास्त काम पशुधन पर्यवेक्षकांचे आहे. परंतु, त्यांच्या कामाची चीज होत नाही. पशुधन पर्यवेक्षकांना डावलल्या जाते. पर्यायाने काम कमी झाल्याचा उचपा घेण्याकरिता पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेंद्र देशपांडे धमक्या देत असल्याचे म्हटले आहे. कार्यालयीन कामे न केल्यास किंवा दवाखान्यात औषध, इंजेक्शन वापरल्यास, पशुपालकांना औषधी दिल्यास पोलिसात तक्रार करून कारागृहात टाकू अशी धमकी देत आहे. त्यामुळे पशुधन पर्यवेक्षकांत धास्ती निर्माण झाल्याचे पत्रकार म्हटले आहे. प्रलंबित मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू असताना वरिष्ठ अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून अधिनिष्ठ कर्मचाऱ्यांना धमक्या देणे अयोग्य आहे. पशुसंवर्धन अधिकाऱ्याच्या विरोधात संघटना उठाव करून त्यांची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भुसारी यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)