आदिवासी कर्जदारांना धमकी व शिवीगाळ

By Admin | Updated: April 1, 2016 01:27 IST2016-04-01T01:27:48+5:302016-04-01T01:27:48+5:30

मूल तालुक्यातील रेगडी येथील आदिवासी शेतकऱ्यांना एका फायनन्स कंपनीने कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती करून हातपाय तोडण्याची धमकी देत दुरध्वनीवरून अश्लील शिविगाळ केली.

Threats and abuses of tribal borrowers | आदिवासी कर्जदारांना धमकी व शिवीगाळ

आदिवासी कर्जदारांना धमकी व शिवीगाळ

मूल पोलीस ठाण्यात तक्रार : जिल्हा अधिकाऱ्याला दिले निवेदन
भेजगाव : मूल तालुक्यातील रेगडी येथील आदिवासी शेतकऱ्यांना एका फायनन्स कंपनीने कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती करून हातपाय तोडण्याची धमकी देत दुरध्वनीवरून अश्लील शिविगाळ केली. त्यामुळे पीडित आदिवासी लाभार्थ्यांनी ‘त्या’ फायनन्स कंपनी विरोधात मूल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून कंपनीवर कारवाहीची मागणी केली आहे.
रेगडी येथील अशोक एकनाथ कुळमेथे यांनी २०१४ मध्ये एका फायनन्स कंपनीकडून १ लाख ४० हजार रुपये गृहकर्ज घेतले. यापैकी जवळपास ५८ हजार रुपये कंपनीला दिले. या दोन वर्षात पिके गेल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यास दिरंगाई होत असल्याने फायनन्स कंपनीने अधिकारी २८ मार्चला कुळमेथे यांच्या घरी सकाळपासूनच दिवसभर ठाण मांडून बसले होते.
परंतु, शेतकऱ्यांने वेळेवर पैसे न जमल्याने विणवणी करून वेळ मागितला असता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उर्मटपणाची परिसिमा गाठत आदिवासी महिलेला गहान राहून तर शेतकऱ्यांना मरा पण कर्जाचे हप्ते भरा असा, दम दिला. अधिकारी एवढ्यावरच थांबले नाही तर रात्री ९ च्या दरम्यान पुन्हा भ्रमणध्वनी करून मुलाचे हातपाय तोडून घरालाही नष्ट करण्याची धमकी दिली.
या प्रकरणात आदिवासी कुटुंबांना मनस्ताप झाला आहे. त्यामुळे पीडित शेतकरी व गावातील विश्वास लक्ष्मण गेडाम, पांडूरंग उष्टूजी पेंदोर, देवानंद गणपत कन्नाके आदी आदिवासी १२ कर्जदारांनी मूल पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यामुळे या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)

Web Title: Threats and abuses of tribal borrowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.