गांगलवाडी गाव उद्ध्वस्त करण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:28 IST2018-05-28T23:28:39+5:302018-05-28T23:28:51+5:30

ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील पंचायत समिती सदस्य सुनिता ठक्कर यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी धमकीपत्र दगडाला बांधून फेकले. यात पत्रात गांगलवाडीतील संपूर्ण घरे, दुकाने पेटवून देऊ व गाव उद्ध्वस्त करू, अशी धमकी देण्यात आली आहे. एखाद्या माथेफिरुने केलेला हा प्रकार असला तरी गावकऱ्यांनी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे.

Threat to destroy the village of Gangalwadi | गांगलवाडी गाव उद्ध्वस्त करण्याची धमकी

गांगलवाडी गाव उद्ध्वस्त करण्याची धमकी

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्ताची मागणी : पं.स. सदस्याच्या घरासमोर निनावी पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील पंचायत समिती सदस्य सुनिता ठक्कर यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी धमकीपत्र दगडाला बांधून फेकले. यात पत्रात गांगलवाडीतील संपूर्ण घरे, दुकाने पेटवून देऊ व गाव उद्ध्वस्त करू, अशी धमकी देण्यात आली आहे. एखाद्या माथेफिरुने केलेला हा प्रकार असला तरी गावकऱ्यांनी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे.
रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास पंचायत समिती सदस्य सुनिता ठक्कर यांचा मुलगा हा घरा शेजारी असलेल्या आपल्या राईस मिलकडे जाण्यासाठी निघाला असता त्याला गेटवरच हे निनावी तीन पत्रे आढळली. यात आम्ही गडचिरोली येथून चार-पाच ट्रॅक भरुन लोक गांगलवाडीत येऊ व सर्व दुकाने, घरे पेटवून टाकू. तसेच चोरीही करून निघून जाऊ, ज्यांना बोलवायचे असेल त्यांना बोलवून घ्या, पोलिसांनाही बोलवा, असे हिंदी भाषेत या पत्रात नमूद केले आहे.
या निनावी धमकीपत्राने गांगलवाडी तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठून सदर निनावी धमकीपत्राच्या जागेचा पंचनामा करुन पत्र आपल्या ताब्यात घेतली आहेत.

Web Title: Threat to destroy the village of Gangalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.