दीक्षाभूमीकडे निघाली हजारो पावले
By Admin | Updated: October 14, 2014 23:15 IST2014-10-14T23:15:39+5:302014-10-14T23:15:39+5:30
येथील दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला आजपासून प्रारंभ होत आहे. दोन दिवसीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, साहित्यिक,

दीक्षाभूमीकडे निघाली हजारो पावले
चंद्रपूर: येथील दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला आजपासून प्रारंभ होत आहे. दोन दिवसीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, साहित्यिक, देश-विदेशातील अभ्यासकांचे प्रबोधन यावेळी होणार आहे. त्यासाठी येथील दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. परिसरात रोषणाई करण्यात आली आहे.
धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ दिनी भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, समीक्षक, साहित्यिक, देशविदेशातील प्रसिद्ध अभ्यासक उपस्थित राहणार आहे. पुस्तकांचे स्टॉल, आरोग्य विभाग, समाजसेवी संघटनांनी आपापले स्टॉल लावले आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिंचे जतन केलेला अस्थिकलश दर्शनार्थ उपलब्ध राहणार आहे. थाईलंैड येथून दीक्षाभूमीवरील बुद्ध विहारात १६.५ फुट उंच अभय मुद्रेतील बुद्धरुपाचे दर्शन तसेच श्रद्धेय भिक्खू संघाकडून धम्म श्रेवणद्वारा धम्ममय आनंदाची रुजवण करण्यात येणार आहे. जगविख्यात बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्म श्रवण द्वारा मानसवृद्धी, धम्मसंबंधीत उपयुक्त वस्तुचे स्टॉल, दीक्षाभूमीवरील रोपणातून बहरलेल्या बोधिवृक्षाचे दर्शन बांधवांना घेता येणार आहे.
संपूर्ण दीक्षाभूमी परिसर रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. दीक्षाभूमीस्थळी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य छायाचित्र उभारण्यात आले आहे. येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभादरम्यान १५ आॅक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजता वाहनासह मिरवणूक निघेल. १६ आॅक्टोबरला सकाळी डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलशासह मिरवणूक निघणार आहे. बौद्ध बांधवांनी सहभागी होण्याची विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)