महामाया गरीब थाळीचा हजारांवर गरजूंनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST2021-06-02T04:22:12+5:302021-06-02T04:22:12+5:30

सन्स मार्ट सिंदेवाहीचे संचालक व युवा उद्योजक अबुलसन लाकडे व बहुजन समाज पार्टी सिंदेवाहीच्या पदाधिकारी यांनी तालुक्यातील गरजूंना केलेल्या ...

Thousands of needy people benefited from Mahamaya Garib Thali | महामाया गरीब थाळीचा हजारांवर गरजूंनी घेतला लाभ

महामाया गरीब थाळीचा हजारांवर गरजूंनी घेतला लाभ

सन्स मार्ट सिंदेवाहीचे संचालक व युवा उद्योजक अबुलसन लाकडे व बहुजन समाज पार्टी सिंदेवाहीच्या पदाधिकारी यांनी तालुक्यातील गरजूंना केलेल्या मोफत वाटप किराणा किटच्या कार्यानंतर, महामाया मोफत गरीब थाळी केंद्र सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केलेला होता. या महामाया गरीब मोफत थाळी केंद्रांतर्गत मे महिन्यात रोज पन्नास मोफत थाळ्यांचे वितरण सिंदेवाहीतील रोजगार गमावलेल्या व निराधार लोकांना स्थानिक तहसील प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन करण्यात आले होते. या कार्यात सिंदेवाही शिक्षण विभागातील शिक्षणतज्ज्ञ तथा बामसेफचे मीडिया प्रभारी प्रा.भारत मेश्राम, बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष नंदू खोब्रागडे व बहुजन विद्यार्थी फेडरेशनचे सचिन शेंडे यांनी सहकार्य केले.

===Photopath===

010621\img-20210517-wa0031.jpg

===Caption===

महामाया गरीब थाळी केंद्राचा हजार गरजूंनीं घेतला लाभ

Web Title: Thousands of needy people benefited from Mahamaya Garib Thali