श्रमतीर्थावर दृष्टी मिळविण्यासाठी हजारोंची गर्दी
By Admin | Updated: December 3, 2014 22:47 IST2014-12-03T22:47:15+5:302014-12-03T22:47:15+5:30
मोजक्या कुष्ठरोगी बांधवांना घेवून कर्मयोगी बाबांनी आनंदवनाची निर्मीती केली. आज आनंदवन श्रमतीर्थ म्हणून सातासमुद्रापलीकडे ओळखले जाते. या श्रमतीर्थावर दृष्टी देण्याचे काम

श्रमतीर्थावर दृष्टी मिळविण्यासाठी हजारोंची गर्दी
वरोरा : मोजक्या कुष्ठरोगी बांधवांना घेवून कर्मयोगी बाबांनी आनंदवनाची निर्मीती केली. आज आनंदवन श्रमतीर्थ म्हणून सातासमुद्रापलीकडे ओळखले जाते. या श्रमतीर्थावर दृष्टी देण्याचे काम मागील १३ वर्षापासून सुरु आहे. दृष्टी मिळावी याकरिता हजारो वृद्ध यावर्षीही श्रमतीर्थावर दाखल झाले आहेत. यावर्षी गर्दीचा उच्चांक मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महारोगी सेवा समिती आनंदवन, जेजे रुग्णालय मुंबई, आय केयर संस्था मुंबई व जिल्हा अंधत्व निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गत १३ वर्षापासून आनंदवन येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीचे शिबिर २७ नोव्हेंबरपासून सुरु झाले आहे. दरवर्षीची गर्दी बघता दृष्टी मिळविण्याकरिता शिबिराच्या तीन दिवसापूर्वी गरजूंनी गर्दी केली. त्यामुळे आनंदवनातील मुख्यमंत्री सभागृह हाऊसफूल झाले.
डोळ्यांच्या तपासणीसाठी जेजे रुग्णालयाचे नेत्र विभागप्रमुख तथा पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. टी. पी. लहाने, नेत्रतज्ञ डॉ. रागीनी पारेख आपल्या सहकाऱ्यासह नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी आनंदवनात दाखल झाले आहेत. आनंदवनातील साईबाबा रुग्णणालयात निवड झालेल्या रुग्णांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे. निवासाची व्यवस्था आनंद विहार, मुकबधीर विद्यालय आदी ठिकाणी करण्यात आली.
मागील वर्षी १२ हजार पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यात १८०० रुग्णांच्या डोळ्यातील मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे यावर्षी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आनंदवानातील व्यवस्थेवर आनंदवनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ व त्यांचे सहकारी आढावा घेत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकाची मदत घेतली जात आहे. त्यामुळे रुग्णांची चांगली सोय आनंदवनच्या शिबिरात झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)