हजारो केंद्रीय पेन्शनधारकांची नागपूरवारी थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST2021-07-14T04:33:22+5:302021-07-14T04:33:22+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचा (सी.जी.एच.एस.) लाभ घेण्यासाठी नागपूरला जावे लागते. त्यामुळे पेंशनधारकांना त्रास सहन ...

Thousands of central pensioners will stay in Nagpur | हजारो केंद्रीय पेन्शनधारकांची नागपूरवारी थांबणार

हजारो केंद्रीय पेन्शनधारकांची नागपूरवारी थांबणार

चंद्रपूर जिल्ह्यातील केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचा (सी.जी.एच.एस.) लाभ घेण्यासाठी नागपूरला जावे लागते. त्यामुळे पेंशनधारकांना त्रास सहन करावा लागतो. चंद्रपूर येथे सी.जी.एच.एस. हॉस्पिटलची व्यवस्था व्हावी, अशी पेंशनधारकांकडून मागणी होत होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता सेवानिवृत्त कर्मचारी तथा चंद्रपूर पेंशनर्स असोसिएशनचे सचिव दौलत बेले यांनी न्यायालयीन लढा दिला. त्यानुसार २८ जूनला आरोग्य विभागाने आदेश काढून चंद्रपूर येथे सी.जी.एच.एस.चे हॉस्पिटल सुरू करण्याला मान्यता दिली. दरम्यान, डॉ. पी. टी. चिमुरकर, डॉ. प्रशांत धनविजय, डॉ. ममता आदेवार या तीन डॉक्टर्सची चमू ८ ते १० जुलै या कालावधीत डेपोटेशनवर हॉस्पिटलकरिता योग्य जागेची पाहणी करण्यास आले होते. यावेळी वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, इंकम टॅक्स विभाग, कलेक्टर कार्यालय, बीएसएनएल आदी शासकीय विभागाच्या इमारतींची पाहणी केली. बसस्थानकाजवळील बीएसएनएल विभागाच्या इमारतीची निवड सीजीएचएस हॉस्पिटलकरिता करण्यात आली. यावेळी चंद्रपूर पेंशनर्स असोसिएशनचे सचिव दौलत बेले, डी. आर. रामटेके, पंढरी पिंपळकर, भारतीय मजदूर संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर साळवे, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार आदी उपस्थित होते.

130721\img-20210710-wa0065.jpg

चंद्रपुर येथे सी.जी.एच.एस. हॉस्पिटल लवकरच सुरु होणार

Web Title: Thousands of central pensioners will stay in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.