राजीव गांधी जयंतीला शेकडोंचे रक्तदान

By Admin | Updated: August 22, 2016 01:52 IST2016-08-22T01:52:43+5:302016-08-22T01:52:43+5:30

स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दाताळा रोडवरील काँग्रेस कमेटी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Thousands of blood donation in Rajiv Gandhi Jayanti | राजीव गांधी जयंतीला शेकडोंचे रक्तदान

राजीव गांधी जयंतीला शेकडोंचे रक्तदान

रक्तदान शिबीर : चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे आयोजन
चंद्रपूर : स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दाताळा रोडवरील काँग्रेस कमेटी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
राजीव गांधी यांचे प्रतिमेला चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुभाष गौर, माजी नगराध्यक्ष व प्रदेश माजी सचिव सुनीता लोढिया, डॉ. विजय देवतळे, अ‍ॅड. विजय मोगरे, अश्विनी खोब्रागडे, केशव रामटेके, राजू सारिडेक, सागर खोब्रागडे, अ‍ॅड. शकीर मलिक, फारुख सिद्दीकी, श्याम राजूरकर, सुलेमान अली, संजय रत्नपारखी, श्रीकांत चहारे, सागर वानखेडे, दीपक कटकोजवार, ज्योती कवठेकर, घनश्याम वासेकर, वंदना भागवत, डॉ. कीर्ती साने यांनी आदरांजली वाहिली. रक्तदान शिबिराचे उद्घाटन काँग्रेस अध्यक्ष नंदू नागरकर यांनी केले.
यावेळी विनायक बांगडे, सुभाष गौर, सुनीता लोढिया, अ‍ॅड. विजय मोगरे, संजय रत्नपारखी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी १०० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्त रक्तदान करून राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केलीे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुरेश दुर्शेलवार, राजू दास, सागर वानखेडे, बंडोपंत तातावार, निखिल धनवलकर, अनिल सुरपाम, शंभरकर, मुकुंद भानारकर आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती साने, वाळके, हिमानी इंदूरकर, पंकज पवार, राहुल हडपे आदींनी विशेष सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Thousands of blood donation in Rajiv Gandhi Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.