शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार समाजाला दिशा देणारे

By Admin | Updated: March 21, 2016 00:42 IST2016-03-21T00:42:18+5:302016-03-21T00:42:18+5:30

शाहु-फुले -आंबेडकर यांचे विचार हेच समाजाला खरी दिशा देऊ शकतात. कार्यक्रमामध्ये या महामानवांचे छायाचित्र लावून वंदन केल्यानेच होणार नसून...

The thoughts of Shahu-Phule-Ambedkar give direction to society | शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार समाजाला दिशा देणारे

शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार समाजाला दिशा देणारे

मोरेश्वर टेमुर्डे : हिराचंद बोरकुटे यांचा पासष्टी सत्कार सोहळा
चंद्रपूर : शाहु-फुले -आंबेडकर यांचे विचार हेच समाजाला खरी दिशा देऊ शकतात. कार्यक्रमामध्ये या महामानवांचे छायाचित्र लावून वंदन केल्यानेच होणार नसून त्यांची शिकवण परिपूर्णपणे अंगीकार करणे गरजेचे आहे. आज या महामानवाच्या विचाराला फाटा दिला जात आहे. हिराचंद बोरकुटे यांनी या महामानवाच्या विचाराला खऱ्या अर्थाने अंगीकारले. म्हणूनच आज त्यांचा हा सत्कार ठेवण्यात आला असून त्यांच्या पासष्टीनिमित्त त्यांना निरामय आयुष्य लाभावे, अशी सदिच्छा या सत्कार समारंभाचे अध्यक्ष माजी विधानसभा उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी व्यक्त केली.
स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघ, चंद्रपूर येथे अ.भा. सत्यशोधक समाजातर्फे शुक्रवारी सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष व पुरोगामी चळवळीचे नेते हिराचंद बोरकुटे यांच्या पासष्टीनिमित्त सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे होते. या कार्यक्रमात हिराचंद बोरकुटे यांनी नेत्रदान व देहदानाचा संकल्प केला. यावेळी मंचावर राकाँचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, शोभाताई पोटदुखे, दुधलकर गुरुजी, अशोक चोपडे, विजय चंदावार, आडकुपाटील नन्नावरे, किशोर पोतनवार, सुभाषसिंग गौर, बळीराज धोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, अ‍ॅड. भगवान पाटील, सुभाष डांगे, विजय मोगरे, शशीकांत देशकर, डी.के. आरीकर, विनोद दत्तात्रेय, राजेंद्र वैद्य, केशव जेनेकर तसेच हिराचंद बोरकुटे व त्यांच्या धर्मपत्नी प्रमिला बोरकुटे या उपस्थित होत्या. याप्रसंगी सत्यशोधक समाजातर्फे हिराचंद बोरकुटे यांना शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि मानवस्त्र प्रदान करून त्यांचा व प्रमिला बोरकुटे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सत्काराप्रसंगी काढलेल्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. सन्मानपत्राचे वाचन प्रा.एस.टी. चिकटे यांनी केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी हिराचंद बोरकुटे यांच्या कार्याचा गौरव करणारे विचार व्यक्त केले. संचालन प्रा.एस.टी. चिकटे यांनी तर आभार डी.के. आरीकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The thoughts of Shahu-Phule-Ambedkar give direction to society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.