कोरोना चाचणी न करणाऱ्यांची तपासणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST2021-03-16T04:29:38+5:302021-03-16T04:29:38+5:30
बल्लारपूर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता तहसील कार्यालय प्रशासनाने दोनदा बल्लारपूर येथील आस्थापना व व्यापारी, सलून व्यवसायी यांच्या ...

कोरोना चाचणी न करणाऱ्यांची तपासणी होणार
बल्लारपूर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता तहसील कार्यालय प्रशासनाने दोनदा बल्लारपूर येथील आस्थापना व व्यापारी, सलून व्यवसायी यांच्या बैठका घेऊन कोरोना आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे. दुकानाला भेटी देऊन त्यांच्याकडे तपासणी केल्याचे प्रमाणपत्र न आढळल्यास कारवाई होणार आहे. त्याआधी सर्वांनी टेस्ट करून घेण्याचे आवाहन तहसीलदार संजय राईंचवार यांनी केले आहे.
यावेळी सभेत उपस्थित व्यापारी व इतर संस्थेच्या सभासदांना तहसीलदार संजय राईंचवार, नायब तहसीलदार रमेश म्हणाले, ग्रामीण रुग्णालयात कोविड आरटीपीसीआर तपासणी करण्याची व्यवस्था आहे. याशिवाय ज्या नागरिकांचे वय ४५ च्यावर आहे असे नागरिकही आपले नाव रुग्णालयात नोंदणी करून लस घेऊ शकतात. यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करून आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.