त्या बेपत्ता अल्पवयीन बिहार राज्यात आढळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:41+5:302021-02-05T07:37:41+5:30

धर्मेंद्रकुमार गणेश तांती (२२) रा.ग्राममजवे जि.जमुई बिहार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रथमेश ...

Those missing minors were found in the state of Bihar | त्या बेपत्ता अल्पवयीन बिहार राज्यात आढळल्या

त्या बेपत्ता अल्पवयीन बिहार राज्यात आढळल्या

धर्मेंद्रकुमार गणेश तांती (२२) रा.ग्राममजवे जि.जमुई बिहार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रथमेश कैलास वानखेडे (२१) रा. शिवाजीनगर भद्रावती असे फरार आरोपीचे नाव आहे. धर्मेंद्र हा गेल्या दहा वर्षांपासून भद्रावती परिसरात मोलमजुरीचे काम करीत होता. धर्मेंद्र व प्रथमेश यांचे १६ व १७ वर्षीय मुलींसोबत प्रेमसंबंध जुळले. या दोघांनी या मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना बिहार राज्यात पळवून नेले. दि. २ जानेवारीपासून अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मोबाइलच्या लोकेशनवरून बिहार राज्यातील नक्षलग्रस्त भागात ते असल्याची माहिती मि‌ळाली. पोलिसांनी तेथे जाऊन दोन्ही मुलींना ताब्यात घेतले. यावेळी धर्मेंद्रला अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध विभागप्रमुख अमोल तुळजेवार, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुदरी, सुषमा पवार, छगन जांभुळे व सायबर सेल चंद्रपूर यांनी केली.

Web Title: Those missing minors were found in the state of Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.