शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादातील 'ती' १४ गावे चंद्रपूर जिल्ह्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:09 IST

महसूल मंत्र्यांची माहिती : विधानभवनात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तेलंगणाच्या सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील १४ मराठी गावे लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (दि. १४) विधानभवनातील दालनात झालेल्या बैठकीत दिली. बैठकीला राजुराचे आमदार देवराज भोंगळे, जिल्हाधिकारी विनय गौडा व जिवती तालुक्यातील १४ गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून ही गावे सीमावादामुळे तेलंगणात की महाराष्ट्रात, या संभ्रमात होती. यामुळे प्रशासन, सुविधा, विकास योजनांचा लाभयाबाबतीत गावांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आता मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे हा जुना व वादग्रस्त प्रश्न कायमचा निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १९७८मध्ये आंध्र प्रदेश व महाराष्ट्र राज्यांनी आपापल्या सीमा आखल्या होत्या. दरम्यान, १९८० सीमावाद सुरू झाला. दोन्ही राज्यांनी १८ फेब्रुवारी १९८३ रोजी एक समिती नेमून नागरिकांचे नोंदविले. तेव्हा सर्वांनी महाराष्ट्रातच राहायचे, असे ठामपणे सांगितले. ७ जुलै १९९० रोजी १४ गावे आंध्र प्रदेश सरकारला देण्याचा शासन निर्णय जारी होताच येथील मराठी नागरिकांनी तीव्र विरोध बयान केला. परिणामी, ५ ऑगस्ट १९९३ रोजी महाराष्ट्र शासनाने यावर स्थगिती आणली. दरम्यान, आंध्र प्रदेश सरकार ३ एप्रिल १९९६ रोजी हैदराबाद उच्च न्यायालयात गेले. महाराष्ट्रानेही ३० एप्रिल १९९६ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. ए. एच. अहमदी, न्या. झाकीर अहमद, न्या. कृपाल सिंग यांच्या खंडपीठाने १७ जुलै १९९७ रोजी निर्णय देत १४ गावे महाराष्ट्राची आहेत. त्यावर आंध्र प्रदेशचा अधिकार नाही, हे स्पष्ट केले होते. मात्र, राज्य विभाजनानंतर तेलंगणा सरकार या गावांना काही सुविधा पुरवून आपला ताबा असल्याचा प्रयत्न करीत आहे.

वर्ग दोन जमिनींना एकचा दर्जा मिळणारराजुरातील सर्वे १ ते ८मधील वर्ग दोनच्या जमिनींना विनामूल्य वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. जिवतीतील कोतवालांच्या रिक्त पद भरतीचा प्रस्ताव मंजूर करण्याचा आदेशही बावनकुळे यांनी दिला.

...ही आहेत गावेपरमडोली, मुकदमगुडा, कोठा (बुज), महाराजगुडा, अंतापूर, येसापूर, लेंडीगुडा, पळसगुडा ही आठ गावे व परमडोली तांडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, पद्मावती, इंदिरानगर, भोलापठार ही सहा पाडे, अशी एकूण १४ गावे महाराष्ट्र-तेलंगणा राज्यांच्या सीमावादात अडकली आहेत.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेTelanganaतेलंगणा