गोदामातून सात पोती धान चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:14 IST2018-04-06T00:14:23+5:302018-04-06T00:14:23+5:30

देवाडा खुर्द येथील शिवारामध्ये असलेल्या गोदामातून सात पोतीे धान भुरट्या चोरांनी पळविले. ही घटना गुरूवारी उघडकीस आली.

Thirty seven grandchildren stolen from the godown | गोदामातून सात पोती धान चोरी

गोदामातून सात पोती धान चोरी

ठळक मुद्देदेवाडा खुर्द येथील घटना : भुरट्या चोरांचा सुळसुळाट

लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : देवाडा खुर्द येथील शिवारामध्ये असलेल्या गोदामातून सात पोतीे धान भुरट्या चोरांनी पळविले. ही घटना गुरूवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोंभुर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवाडा खुर्द-थेरगाव या मुख्य रस्त्याच्या बाजुला प्रकाश देवतळे यांचे शेत आहे. या शेतामध्ये धान साठवून करून ठेवण्यासाठी गोदाम असून त्यांची शेती देवाडा खुर्द येथील निळकंठ नैताम हे गेल्या तीन वर्षांपासून करीत आहेत. त्यांनी मळणी केल्यानंतर २० पोते धान गोदामात साठवून ठेवले होते.
बुधवारच्या रात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी सात पोते धान चोरून नेले. तसेच संरक्षण कुपणासाठी लावलेले २० नग लोखंडी एंगलही पळविले. याबाबत निळकंठ नैताम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Thirty seven grandchildren stolen from the godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.