ग्रामीण भागात हागणदारीमुक्तचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:28 IST2021-01-20T04:28:24+5:302021-01-20T04:28:24+5:30
मात्र या मोहिमेला ग्रामीण भागात गालबोट लागले असून हागणदारीमुक्त गाव योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. गावाच्या सुरूवातीला व शेवटी मुख्य ...

ग्रामीण भागात हागणदारीमुक्तचे तीनतेरा
मात्र या मोहिमेला ग्रामीण भागात गालबोट लागले असून हागणदारीमुक्त गाव योजनेचे तीनतेरा वाजले आहेत.
गावाच्या सुरूवातीला व शेवटी मुख्य रस्तावर दुर्गंधीचे साम्राज्य असल्याने प्रतिष्ठितांना मुख्य रस्तावरुन चालणे कठीण होत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करुन निर्मल ग्राम मोहीम राबवली. लाखो रुपयांची बक्षिसेही गावांना दिली गेली. मात्र बक्षीस पात्र गावातही चित्र वेगळे नाही.
त्यामुळे निर्मल ग्राम योजनेलाच मूल तालुक्यात सुरुंग लागल्याचे चित्र आहे.
याबाबत स्थानिक प्रशासनही गंभीर नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक थोर संतांनी महाराष्ट्राच्या जनतेला वैचारिक व मानसिक दिशा दिली. निस्वार्थ सेवेतून दिलेली सेवा जनतेने यावेळी अंगीकारली. हागणदारीमुक्त देशाचे स्वप्ने यावेळी रंगवण्यात आली. मात्र २१ व्या शतकातही आपली युवापिढी समाज मनात निर्मल ग्रामचे महत्त्व पटवून देण्यात कमी पडत आहे.
प्रशासनालाही आता याचे काही सोयीरसुतक राहिले नाही. कागदी घोडे नाचवण्यात प्रशासन मशगुल असल्याने मूल तालुक्यातील ग्रामीण भागात हागणदारीमुक्तीचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे.