स्वच्छ अभियान सर्वेक्षणात मूल नगरपरिषद देशातून तिसरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:35 IST2019-07-25T00:34:19+5:302019-07-25T00:35:16+5:30
केंद्र शासनाच्या वतीने आयोजित स्वच्छ अभियान सर्वेक्षण स्पर्धेत मूल नगरपरिषदने देशातून तिसरा क्रमांक पटकावला आहे.

स्वच्छ अभियान सर्वेक्षणात मूल नगरपरिषद देशातून तिसरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल: केंद्र शासनाच्या वतीने आयोजित स्वच्छ अभियान सर्वेक्षण स्पर्धेत मूल नगरपरिषदने देशातून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
मुंबई येथील जमशेद भाभा थिएटरमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, नगरसेवक विद्या बोबाटे, प्रभा चौथाले, प्रभाकर भोयर प्रशांत बोबाटे आदी उपस्थित होते. न. प. पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी विशेष प्रयत्न केल्याने हा पुरस्कार खेचुन आणता आला, हे विशेष.