मंदिरातील दानपेट्या फोडणारे चोरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:51 IST2021-03-13T04:51:16+5:302021-03-13T04:51:16+5:30

चंद्रपूर : शहरातील मंदिरामध्ये दानपेट्या फोडणाऱ्या तसेच दुचाकी चोरट्यांना शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. गणेश ...

Thieves break the temple treasury | मंदिरातील दानपेट्या फोडणारे चोरटे गजाआड

मंदिरातील दानपेट्या फोडणारे चोरटे गजाआड

चंद्रपूर : शहरातील मंदिरामध्ये दानपेट्या फोडणाऱ्या तसेच दुचाकी चोरट्यांना शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. गणेश सुधाकर तेलंग (२०), प्रवीण नरसय्या बोड्डू (३०) रा. लालपेठ कॉलरी असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. दोघांकडून तीन दुचाकी व रोकड असा एक लाख १० हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चंद्रपूर महाकाली मंदिरजवळील दत्त मंदिर व जेल परिसरातील हनुमान मंदिर येथील दानपेटी चोरल्याची तसेच शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी गेल्याच्या तक्रारी शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. गुन्हे शोध पथकाने तपास करून गणेश तेलंग व प्रवीण बोड्डू याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी तीन ठिकाणी लपवून ठेवलेल्या तीन दुचाकी व दानपेटीतील ४३५ रुपये असा एकूण १ लाख १० हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर अंबोरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघमारे, बाबा डोमकावडे, विलास निकोडे, पांडुरंग वाघमोडे, प्रमोद डोंगरे, संजीवनी दराडे यांनी केली

Web Title: Thieves break the temple treasury