चोरट्यांनी फोडले कपड्याचे दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:28 IST2021-03-26T04:28:03+5:302021-03-26T04:28:03+5:30

तालुक्यातील चांदली येथील रहिवासी असलेल्या मंगेश करंबे यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाळीत एक कापडाचे दुकान आहे. सदर दुकान ...

Thieves break into clothing store | चोरट्यांनी फोडले कपड्याचे दुकान

चोरट्यांनी फोडले कपड्याचे दुकान

तालुक्यातील चांदली येथील रहिवासी असलेल्या मंगेश करंबे यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाळीत एक कापडाचे दुकान आहे. सदर दुकान बंद करून दुकानाचे मालक रात्री घरी गेले होते.

पहाटे ४ वाजेच्या सुमारास काही ऑटोचालक आपले ऑटो घेऊन आले आणि दुकानाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत आपले ऑटो पार्क केले. तेव्हा त्यांना सदर दुकानाचे शटर उघडे दिसले. त्यांना शंका आली म्हणून त्यांनी लगेच दुकान मालक मंगेश करंबे यांना मोबाईलवरून माहिती दिली. माहिती मिळताच दुकान मालक त्वरित दुकानात आले तर त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसले. लगेच मंगेश करंबे यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुध्द कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.

Web Title: Thieves break into clothing store