चोरट्यांचा सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:33 IST2021-09-04T04:33:47+5:302021-09-04T04:33:47+5:30

आकाश पिपरे (२५) असे जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरक्षा ...

Thieves attack security guard | चोरट्यांचा सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला

चोरट्यांचा सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला

आकाश पिपरे (२५) असे जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरक्षा रक्षक हे रात्रपाळीत वेकोलिच्या एरिया स्टोअरच्या गेटवर तैनात होते. गुरुवारी रात्री तीन अनोळखी इसमांनी वेकोलिच्या एरिया स्टोअर्समध्ये प्रवेश करून चोरी करण्याच्या प्रयत्न केला. कर्तव्यावर असलेल्या पिपरे यांनी प्रतिबंध केला असता यातील आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून जखमी केले व तेथून पसार झाले. याप्रकरणी वेकोलिचे सुरक्षा रक्षक अविनाश मारोती धगडी यांनी माजरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार वीनित घागे यांनी तीन तासांत आरोपींना अटक केली.

030921\181-img-20210903-wa0109.jpg

चोरट्यांनी केला वेकोलि सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला

Web Title: Thieves attack security guard