शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपान न करताही होतात या आजारांमुळे लिव्हर खराब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:21 IST

Chandrapur : मधुमेहामुळेही यकृताचे होऊ शकते नुकसान, प्रत्येक नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : फक्त दारुमुळेच यकृत खराब होते, असा नागरिकांमध्ये समज आहे. हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, आनुवंशिक आजार, मधुमेहामुळेही यकृताचे नुकसान होऊ शकते. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार मद्यपान न करता चुकीच्या जीवनशैलीमुळे होऊ शकतो. शिवाय जास्त प्रमाणात मद्यपान, शारीरिक क्रियाशील नसणे यामुळे यकृताशी संबंधित समस्या वाढत आहेत.

लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हरचे प्रमाण महिला, पुरुष तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे दारू न पिणाऱ्यांनासुद्धा हा त्रास होऊ शकतो. आरोग्य सुदृढतेसाठी दररोज व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.

लिव्हर खराब होण्याची कारणे काय?दारू हे यकृत खराब होण्याचे प्रमुख कारण मानले जाते व यकृतासाठी सर्वात हानिकारक आहे. अल्कोहोल डिहाइड्रेटिंग एजंट म्हणून कार्य करते. ज्यामुळे यकृताला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे शक्य होते.

दारू पीत नसलेल्यांचेही लिव्हर खराब !अल्कोहोलचे सेवन न करणाऱ्या व्यक्तींमध्येही यकृतासंबंधित समस्या आढळून येतात. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार मद्यपान न करता चुकीच्या लाइफस्टाइलमुळे होऊ शकतो.

तेलकट-तिखट, मद्यपानाचाही फटकामांस, ट्रान्स फॅट, प्रक्रिया केलेले कार्ब आणि प्रक्टोज यासारख्या वाईट आहाराच्या सवयींचे सेवन व मद्यपान यकृताला झपाट्याने नुकसान करते आणि यकृत निकामी होऊ शकते.

लिव्हर फायब्रोसिस व फॅटी लिव्हरचा काय संबंध ?

  • लिव्हर फायब्रोसिस आणि फॅटी लिव्हरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
  • या आजारामुळे जठरातील कोणत्याही प्रकारच्या संसर्गाशिवाय आणि मद्यपानाच्या सवयीशिवायही लिव्हरच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

काय काळजी घ्याल?लठ्ठपणा वाढल्यामुळे यकृतातील पेशींमध्ये चरबी जमा होते. यामुळे यकृत सिरोसिससारख्या समस्या होऊ शकतात. जास्त लठ्ठ आणि मधुमेही लोकांना असे होण्याची शक्यता जास्त असते. लठ्ठपणामुळे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगाचा धोका लक्षणीय वाढतो. त्यामुळे लठ्ठपणा वाढू न देणे आवश्यक आहे.

लिव्हर सिरोसिसची लक्षणे

  • थकवा, भूक न लागणे, अशक्तपणा ही सामान्य लक्षणे आहेत.
  • यकृत ८० टक्क्यांपर्यंत खराब होते, तेव्हा लिव्हर सिरोसिसची लक्षणे दिसतात.

"दारू पिणाऱ्यांना लिव्हरचा त्रास होतोच. अनेकवेळा दारू न पिणाऱ्यांनासुद्धा लिव्हरचा त्रास होऊ शकतो. याकरिता साधी जीवनशैली, संतुलित आहार, व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. जंक फूड कटाक्षाने टाळावे. यकृत निरोगी असेल तर आपले संपूर्ण शरीर योग्य प्रकारे कार्य करते."- डॉ. अशोक वासलवार, हृदयरोग तथा मधुमेहतज्ज्ञ, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य