नोटीस बोर्ड छे, हा तर कागदांचा ढिगारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST2021-03-08T04:26:26+5:302021-03-08T04:26:26+5:30

महापालिका प्रशासन वेळोवेळी नागरिकांना सूचना तसेच विविध कारणांसांठी असलेल्या कामाचे प्रयोजन नोटीस बोर्डवर लावते. यामध्ये कर वसुली, ना ...

There's a notice board, it's a pile of papers | नोटीस बोर्ड छे, हा तर कागदांचा ढिगारा

नोटीस बोर्ड छे, हा तर कागदांचा ढिगारा

महापालिका प्रशासन वेळोवेळी नागरिकांना सूचना तसेच विविध कारणांसांठी असलेल्या कामाचे प्रयोजन नोटीस बोर्डवर लावते. यामध्ये कर वसुली, ना हरकत प्रमाणपत्र, विविध कामांच्या निविदा आदी विषयासंदर्भात प्रशासकीय स्तरावर त्या-त्या कामासंबंधी माहितीसाठी नोटीस बोर्डवर संबंधित कागदपत्र लावले जाते. मात्र चंद्रपूर महापालिकेच्या सात मजली इमारतीमधील तळमजल्यावर लावलेला नोटीस बोर्ड बघून अनेकांना घाम सुटत आहे. महापालिकेने लावलेला संबंधित कागद कुठे आहे, हे शोधण्यातच दिवस जात असल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढत आहे. एक-दोन किंवा दहा-वीस नोटीस नाही तर चक्क शेकडो नोटीस या छोट्या असलेल्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या. आहे. विशेष म्हणजे, काही नोटीसची मुदतही निघून गेली आहे. मात्र उदासीन असलेल्या महापालिका प्रशासनाला याचे काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे.

बाॅक्स

कोणीही या आणि नोटीस लावून जा

सात मजली इमारतीच्या अगदी पायऱ्या शेजारीच नोटीस बोर्ड आहे. या बोर्डला आजच्या घडीला कागदाचे वजनही पेलण्याची क्षमता नाही, एवढे नोटीस लावून महापालिका प्रशासन मोकळे झाले आहे. मात्र संबंधित व्यक्तीला नोटीस शोधताना किती अडचण होत असेल, याचा साधा विचारही येथील अधिकाऱ्यांनी केलेला नाही. कोणत्याही विभागातून नोटीस निघाल्यानंतर या बोर्डवर लावून आपली जबाबदारी अधिकारी पूर्ण करीत आहे.

बाॅक्स

नोटीस बोर्ड नेमका कुणाचा?

महापालिकेने प्रशासकीय कामे सोपी व्हावी यासाठी सात मजली इमारतीत काही कार्यालये सुरू केली आहे. यामध्ये कर विभाग, गुंठेवारी प्रकरण, जन्म-मृत्यू नोंदणी आदींचा समावेश आहे. यामध्ये तळमजल्यावर असलेल्या पायऱ्यांच्या अगदी शेजारी एक छोटीसी जागा असून त्याला ग्रील लावण्यात आले आहे. मात्र हा नोटीस बोर्ड नेमका कुणाचा, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बोर्डवर ना कुणाचे नाव आहे, ना पत्ता, त्यामुळे नागरिक अंदाजानेच येथे आपल्या संदर्भातील नोटीस बघत आहे. काही वेळा असामाजिक तत्त्वाचे नागरिक नोटीस फाडून मोकळेही होत आहे.

Web Title: There's a notice board, it's a pile of papers