सरपंचपदासाठी होणार रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:26 AM2021-01-22T04:26:17+5:302021-01-22T04:26:17+5:30

शेगाव : शेगाव ग्रामपंचायतच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गावातील पाच प्रभागातून १३ उमेदवार निवडून द्यायचे होते. त्यात काँग्रेसप्रणीत लोंढे, ...

There will be a tug of war for the Sarpanch post | सरपंचपदासाठी होणार रस्सीखेच

सरपंचपदासाठी होणार रस्सीखेच

googlenewsNext

शेगाव : शेगाव ग्रामपंचायतच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गावातील पाच प्रभागातून १३ उमेदवार निवडून द्यायचे होते. त्यात काँग्रेसप्रणीत लोंढे, घोडमारे पॅनलचे सहा उमेदवार विजयी झाले व शिवसेनाप्रणीत राऊत, ठाकरे गटाचे पाच उमेदवार निवडून आले. भाजप बच्चुवार, नरडप्रणीत गटाचा फक्त एकच उमेदवार निवडून आला. प्रहारचा एक उमेदवार निवडून आला. एकालाही स्पष्ट बहुमत नसल्याने सरपंच पदाकरिता चांगलीच रस्सीखेच होणार आहे.

सत्तेच्या महत्त्वाकांक्षा पोटी जुळवाजुळवी करून सात नवनिर्वाचित सदस्य सेनेने आपल्या खेम्यात घेऊन त्याच रात्रीला अज्ञात स्थळी कुठेतरी तीर्थयात्रेला निघून गेल्याने गावात आता फक्त काँग्रेसप्रणीत उमेदवारच हिरमुसलेल्या अवस्थेत दिसत आहे. कोणत्याही क्षणी या पॅनलला सत्तेपासून वंचित करण्याचा तीनही पॅनलची खेळी दिसत आहे. निघणाऱ्या सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, कोणाच्या गळ्यात तालुक्यातील सर्वांत मोठ्या गावांच्या सरपंचपदाची माळ पडते याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Web Title: There will be a tug of war for the Sarpanch post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.