चंद्रपूर जिल्ह्यात नवीन दहा कोळसा खाणी होणार

By Admin | Updated: December 2, 2014 23:04 IST2014-12-02T23:04:13+5:302014-12-02T23:04:13+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्राथमिक गरजांना प्राधान्य देऊन त्यावर उपायात्मक पाऊल उचलले आहे. या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून मला समस्यांची जाणीव आहे.

There will be new ten coal blocks in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात नवीन दहा कोळसा खाणी होणार

चंद्रपूर जिल्ह्यात नवीन दहा कोळसा खाणी होणार

रोजगार देण्यावर भर : हंसराज अहीर यांचा बल्लारपुरात सत्कार
बल्लारपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्राथमिक गरजांना प्राधान्य देऊन त्यावर उपायात्मक पाऊल उचलले आहे. या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून मला समस्यांची जाणीव आहे. या साऱ्या समस्यांचा निपटारा करू, तसेच येथील युवकांना रोजगार मिळावा याकरिता नवीन उद्योग निर्माण करण्यावर माझा भर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात येत्या एक वर्षात वेकोलिच्या नवीन दहा कोळसा खाणी सुरु करुन बेरोजगारांना काम आणि ऊर्जेबाबत देशाला सक्षम बनविण्याचे ठरविले असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
मंत्री झाल्यानंतर ना. अहीर यांचे बल्लारपुरात प्रथम आगमन झाले. त्यानिमित्त येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
मंचावर चंदनसिंह चंदेल, जैनुद्दीन जव्हेरी, हरिष शर्मा, शिवचंद द्विवेदी, अजय दुबे, रेणुका दुधे, डॉ. खान, रामधन सोमानी, जुम्मन, जगदीश गहेरवार, चव्हाण, श्रीनिवास सुंचूवार आदींटी उपस्थिती होती. ना. अहीर म्हणाले, देशात २१६ शासकीय कंपन्या बंद पडल्या आहेत. त्या परत सुरु करुन त्या फायद्यात आणण्याचा संकल्प आहे. तद्वतच, प्लॉस्टिकच्या वस्तू तयार करण्याच्या कारखान्यात आज सुमारे तीन लाख सक्षम कारागिरांची गजर आहे. या भागात तसे कारागीर तयार होईल ते रोजगाराला लागावेत याकरिता चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात तसेच प्रशिक्षण केंद्र उघडले जाणार आहे.
रेल्वे प्रवासासंबंधी गाड्यांबाबत काही मागण्या आहेत. त्यावरही ते बोलले.पिकांवरील उत्पादीत खर्चाहून अधिक भाव शेतकऱ्यांना मिळावा याकरिता स्वामीनाथन रिपोर्ट लागू करुन शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असल्याचे व केंद्र सरकारची ही मोठी कामगिरी ठरणार आहे. असे ते म्हणाले. आपण आणि ना.सुधीर मुनगंटीवार आम्ही दोघेही या भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्नशील आहोत. भरमसाठ आश्वासन आम्ही देणार नाही आणि दिलेली आश्वासन पूर्ण केल्याविना रहणार नाही,असे शेवटी ते म्हणाले.
प्रास्ताविक निले खरबडे, संचालन व आभार धर्मप्रकाश दुबे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: There will be new ten coal blocks in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.