१५ दिवस ऐकायला येणार घरघर आवाज

By Admin | Updated: September 30, 2014 23:34 IST2014-09-30T23:34:27+5:302014-09-30T23:34:27+5:30

मागील काही दिवसांपासून शहरात पहाटेपासून घरघर असा आवाज ऐकायला येत आहे. या आवाजामुळे नागरिक भयभित झाले आहे. मात्र हा आवाज अन्य कशाचाही नसून तो चंद्रपूर महाऔष्णिक वीज

There will be 15 days to hear the noise | १५ दिवस ऐकायला येणार घरघर आवाज

१५ दिवस ऐकायला येणार घरघर आवाज

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरात पहाटेपासून घरघर असा आवाज ऐकायला येत आहे. या आवाजामुळे नागरिक भयभित झाले आहे. मात्र हा आवाज अन्य कशाचाही नसून तो चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या विस्तारीत प्रकल्पाच्या संच क्रमांक ८ चा आहे. या आवाजामुळे तसेच प्रदूषणामुळे नागरिकांना पुन्हा समस्यांचा सामना करावा लागणार आहे. मात्र हा आवाज नागरिकांना पुन्हा १५ दिवस ऐकायला येणार आहे.
प्रदूषणामध्ये अव्वल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस प्रदूषणाचा प्रश्न बिकट होत आहे. प्रदूषण घटण्याऐवजी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाढते औद्योगिकरण आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात घरघर आवाज ऐकला येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. अनेकजण घराबाहेर निघून आवाज कुठचा, याचा अंदाज घेत आहे. अनेकजण आवाजामुळे शंका-कुशंकाही व्यक्त करीत आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या विस्तारीत प्रकल्पाचा संच क्रमांक ८ मध्ये सध्या उच्च दाबेच्या वाफेचे उत्सर्जन सुरु आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरात मोठ्याने शिट्टी फुंकल्यासारखा आवाज येत आहे. लवकरच हा संच कार्यान्वित होणार आहे.
कार्यान्वित होण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या चाचण्यांचा हा एक भाग असल्याने या संचातून आवाज ऐकाला येत आहे.(नगर प्रतिनिधी)

Web Title: There will be 15 days to hear the noise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.