राजुऱ्यात तलवारी चालल्या

By Admin | Updated: March 18, 2016 00:57 IST2016-03-18T00:57:43+5:302016-03-18T00:57:43+5:30

राजुरा शहरातील कर्नल चौकात गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कोळसा वाहतुकीवरून तलवारी निघाल्या. चारचाकी वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी

There is a sword in the kingdom | राजुऱ्यात तलवारी चालल्या

राजुऱ्यात तलवारी चालल्या

चार जखमी : कोळसा वाहतुकीचा वाद विकोपाला
राजुरा : राजुरा शहरातील कर्नल चौकात गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कोळसा वाहतुकीवरून तलवारी निघाल्या. चारचाकी वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी चौघांवर एकाचवेळी हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केले. हल्ल्यानंतर हल्लेखोर आसिफाबाद मार्गे पसार झालेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
राजुरा येथील कर्नल चौकात शेखर राजंटी, गोलु बहुरिया, मनिष राजंटी, किसन रईकवार हे चौघे एखा दुकानात मंचुरीयन खात होते. याचवेळी एका चारचाकी वाहनातून पाच ते सहाजण खाली उतरले. त्यातील एकाच्या हातात तलवार, दुसऱ्याच्या हाती कुऱ्हाड, तर तिसऱ्याच्या हाती अन्य शस्त्र हाते. भरचौकात हाती शस्त्र घेऊन निघालेल्या या हल्लेखोरांना पाहून परिसरातील नागरिकांची धावपळ सुरू झाली. काय झाले कुणालाच काही कळेना. हाती शस्त्र घेऊन मंचुरियनच्या दोघाना पोहचलेल्या या हल्लेखोरांनी शेखर राजंटी, गोलु बहुरिया, मनिष राजंटी, किसन रईकवार शेखर राजंटी या चौघांवर एकाचवेळी हल्ला चढविला. या हल्यात शेखर राजंटीच्या पायावर तर किसन रहीकवार यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. गोलु बहुरिया आणि मनिष राजंटी हेसुद्धा या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत. हा हल्ला सुरू असताना तेथे बघ्यांची एकच गर्दी केली होती. (शहर प्रतिनिधी)

ही घटना अवघ्या १० मिनिटांत घडली
ज्यांच्यावर हल्ला झाला, त्यांपैकी तिघांची गुरूवारी सायंकाळी पाच वाजताच राजुरा न्यायालयातून जामिनावर सुटका झाली होती. त्यांच्यावर हल्लेखोरांनी पाळत ठेवली होती. स्थानिक कर्नल चौकात त्यांना गाठून त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढविला.

दोन गटांतील वाद
कोळसा वाहतुकीवरून गोवरी येथे एक दिवसापूर्वी दोन मजुरांच्या दोन गटात वाद झाला होता. या वादातूनच हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असुन ठाणेदार प्रमोद डोंगरे या घटनेचा तपास करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर हल्लेखोरांचे धागेदोरे गवसले नव्हते.

Web Title: There is a sword in the kingdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.