नवेगावात लागत आहे अचानक आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:12 AM2021-01-24T04:12:07+5:302021-01-24T04:12:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सिंदेवाही : तालुक्यातील नवेगाव (लोण) येथे गेल्या दहा दिवसांपासून अचानक आग लागण्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी ...

There is a sudden fire in Navegaon | नवेगावात लागत आहे अचानक आग

नवेगावात लागत आहे अचानक आग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सिंदेवाही : तालुक्यातील नवेगाव (लोण) येथे गेल्या दहा दिवसांपासून अचानक आग लागण्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून घटनास्थळी गस्त ठेवल्याने या दोन दिवसात आग लागण्याची घटना घडलेली नाही, हे विशेष. त्यामुळे या आग लागण्याच्या घटना मानवनिर्मित असल्याचा दावा अंनिस व पोलिसांनी केला आहे.

वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याने शुक्रवारी पोलिसांनी चंद्रपूरवरून डॉग स्कॉड बोलावले होते. यावेळी संपूर्ण तपासणी करून पंचनामे करण्यात आले. पोलीस विभाग व अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिंदेवाही त्यांच्या माध्यमातून गावात आग कशी लागू शकते, केमिकल वापरल्याने आग किती मिनिटात लागते आणि किती मिनिटात विझते, याचे प्रात्यक्षिक दाखवून गावात जनजागृती करण्यात आली. ही आग मानवनिर्मितच असू शकते, असा दावा अंनिसने केला आहे.

कोट

जादूटोण्याने किंवा मंत्राने आग लागू शकत नाही. लवकरच पोलीस या प्रकरणाचा छडा लावून दोषींवर कारवाई करतील.

- योगेश घारे, पोलीस निरीक्षक, सिंदेवाही.

Web Title: There is a sudden fire in Navegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.