बुडीत मजुरीच्या धनादेशाचे अद्याप वाटप नाही

By Admin | Updated: May 18, 2016 00:57 IST2016-05-18T00:57:57+5:302016-05-18T00:57:57+5:30

शासनाने प्राथमिक स्वास्थ्य केंद्रामार्फत दारिद्र्यरेषेखालील असलेल्या प्रसूती झालेल्या मातेच्या नावे चार हजार रुपयांचा धनादेश देण्यात येतो.

There is still no disbursement of the Bad Labor Check | बुडीत मजुरीच्या धनादेशाचे अद्याप वाटप नाही

बुडीत मजुरीच्या धनादेशाचे अद्याप वाटप नाही

शासनाप्रति नाराजी : दखल घेण्याची मागणी
चौगान : शासनाने प्राथमिक स्वास्थ्य केंद्रामार्फत दारिद्र्यरेषेखालील असलेल्या प्रसूती झालेल्या मातेच्या नावे चार हजार रुपयांचा धनादेश देण्यात येतो. मात्र सहा महिने लोटूनही लाभार्थ्यांना सदर बुडीत मजुरीचे धनादेश न दिल्याने नाराजी पसरली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो लाभार्थी सहा महिन्यांपासून या लाभापासून वंचित आहेत.
शासनामार्फत प्रसूत झालेल्या महिलेच्या नावे चार हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला जातो. जे लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील आहेत, अशांनाच या योजनेचा लाभ मिळतो. ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयांतर्गत प्राथमिक स्वास्थ्य केंद्र गांगलवाडी, चौगान आणि अन्य ठिकाणच्या लाभार्थ्यांना सदर अनुदान प्राप्त न झाल्याने शासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शासनाने याची वेळीच दखल घ्यावी व लाभार्थ्यांना त्वरित अनुदान वितरित करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत प्राथमिक स्वास्थ्य केंद्र गांगलवाडी येथील कर्मचाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन विचारणा केली असता नोव्हेंबर २०१५ पासूनच्या लाभार्थ्यांना अजून अनुदान देण्यात आले नाही. निधी प्राप्त न झाल्याने तालुक्यात शेकडो लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही हीच स्थिती असल्याचे सांगितले.
यावरुन लोकप्रतिनिधी व शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असून लाभार्थ्यांना वेळीच बुडीत मजुरीचे धनादेश वितरित करावेत, अशी मागणी तालुक्यातील लाभार्थी करीत आहेत. याची शासन कधी दखल घेते, याकडे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)

Web Title: There is still no disbursement of the Bad Labor Check