दोन वर्षे लोटूनही वेकोलिशी करार नाही
By Admin | Updated: December 23, 2016 00:44 IST2016-12-23T00:44:09+5:302016-12-23T00:44:09+5:30
दर तीन वर्षांनी होणारा गृहकर आकारणीचा करार संपुष्टात येऊन दोन वर्षे लोटले. मात्र अजूनही नवीन करार ग्रामपंचायतीकडून झाला नाही.

दोन वर्षे लोटूनही वेकोलिशी करार नाही
महसुलावर पाणी : गृहकरातून मिळतात २२ लाख
घुग्घुस : दर तीन वर्षांनी होणारा गृहकर आकारणीचा करार संपुष्टात येऊन दोन वर्षे लोटले. मात्र अजूनही नवीन करार ग्रामपंचायतीकडून झाला नाही. त्यामुळे वेकोलिला फायदा तर घुग्घुस ग्रामपंचायतीला तोटा सहन करावा लागत आहे. याचा परिणाम थेट विकास कामांवर होत आहे.
मार्च २०१४-१५ या अर्थिक वर्षांत वेकोलिचा गृहकर आकारणीचा करार संपुष्टात आला. मात्र दर तीन वर्षांनी केला जाणारा हा करार अजूनही ग्रामपंचायत आणि वेकोलिने केलेला नाही. या परिसरातील एसीसी व लायड या कंपनी सोबत यापुर्वीच करार झाला आहे. वेकोलिकडून दरवर्षी २२ लाख रुपये गृहकराच्या माध्यमातून मिळत होते. मात्र २०१४ च्या नविन वित्तीय वर्षानंतर नवीन नियमानुसार गृहकर आकारणी ग्रामपंचायतीने केली आणि मागणी केली. मात्र वेकोलि आधिकाऱ्यांनी ही मागणी अजुनही मान्य केलेली नाही. विश्वसनीय सुत्राच्या माहितीनुसार, वेकोलि व ग्रामपंचायत प्रशासनाच्या बैठकी झाल्या. मात्र करार झाला नाही. वेकोलि अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरण व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे लाखो रुपयाच्या महसूलापासून ग्रामपंचायत दूर आहे. (वार्ताहर)