रस्ता नाही, मुरुम तरी टाका

By Admin | Updated: July 7, 2016 00:50 IST2016-07-07T00:50:32+5:302016-07-07T00:50:32+5:30

येथील वॉर्ड क्र. ६ च्या कांबळे ले- आऊट लोक वसाहतीमध्ये रस्त्याचे बांधकाम करावे, यासाठी महिलांकडून गेल्या वर्षीपासून

There is no road | रस्ता नाही, मुरुम तरी टाका

रस्ता नाही, मुरुम तरी टाका

महिलांची मागणी : घुग्घुस येथील कांबळे ले-आऊटमधील प्रकार
घुग्घुस : येथील वॉर्ड क्र. ६ च्या कांबळे ले- आऊट लोक वसाहतीमध्ये रस्त्याचे बांधकाम करावे, यासाठी महिलांकडून गेल्या वर्षीपासून ग्रामपंचायतीकडे सातत्याने मागणी व पाठपुरावा सुरू आहे. मात्र अद्यापही रस्ताचे काम झाले नाही. पावसाचे पाणी रस्त्यावर साचले असून घराबाहेर ये-जा करता येत नाही. म्हणून त्रस्त झालेल्या महिलांनी रस्ता नाही तर आता मुरुम तरी टाकून द्या, अशी मागणी महिलांनी केली आहे.
या वॉर्डामध्ये रस्ता नसल्याचे घरी ये- जा करणे त्रासाचे झाले आहे. तर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे या वॉर्डाच्या ग्रामपंचायत सदस्य सुचिता लुटे, साजन गोहणे यांनी वारंवार रस्त्याची व नाल्या बनविण्याची मागणी सरपंचाकडे केली. या परिसरातील ज्योती काकडे, पुष्पलता ताकसांडे, लक्ष्मी झुझीपेली, उषा कांबळे, रुंदा करमणकर, फुलचंद ताकसांडे सह अन्य महिलांनी सुद्धा वारंवार लेखी स्वरुपात तक्रारी केल्या. मात्र सरपंचाकडून आश्वासनच मिळाले. शेवटी काय रस्ता नाही तर मुरुम तरी टाकून द्या अशी मागणी महिलांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: There is no road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.