नांदगाव पोडे गावात एकही उमेदवार पोडे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST2021-01-13T05:13:50+5:302021-01-13T05:13:50+5:30
विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात पोडे आडनावाचा एकही व्यक्ती उभा नाही. नांदगाव हे गाव ...

नांदगाव पोडे गावात एकही उमेदवार पोडे नाही
विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात पोडे आडनावाचा एकही व्यक्ती उभा नाही. नांदगाव हे गाव पोडे या नावानेच ओळखल्या जाते. जवळपास ७० घरे पोडे आडनावाची आहेत. परंतु या निवडणुकीत एकाही पोडे आडनावाच्या व्यक्तीने रस दाखविला नाही. ही बाब गावात चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र आघाड्यांचे नेतृत्व पोडे यांच्याच कडे असल्याने अप्रत्यक्षरीत्या पोडे यांचे प्राबल्य आहे.
भाजपा समर्थक शेतकरी ग्राम विकास आघाडीचे नेतृत्व पं. स. सदस्य सभापती गोविंदा पोडे करीत आहेत, तर काँग्रेस समर्थित युवा ग्राम विकास आघाडीचे नेतृत्व माजी सरपंच मधुकर पोडे करीत आहेत. या गावात १,४९६ पुरुष व १,३५९ स्त्री असे २,८५५ मतदार आहेत. ११ सदस्य निवडून देण्यासाठी २७ उमेदवार रिंगणात उभे आहेत. अपवादात्मक परिस्थिती वगळता काँग्रेस व भाजपामध्ये सरळ लढत होणार आहे. परंतु वॉर्ड क्रमांक दोनमध्ये माजी उपसरपंच मल्लेश कोडारी (भाजपा), सागर मोजरकर (काँग्रेस), भास्कर कांबळे (अपक्ष) असे तिहेरी लढतीचे चित्र दिसत आहे. माजी जि. प. सदस्य मनोहर देऊळकर यांची स्नुषा मंजू देऊळकर या प्रभाग क्रमांक ३ मधून उभ्या आहेत. आजी-माजी सरपंचांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीच्या रिंगणात कोण बाजी मारतो हे १५ जानेवारीनंतर कळेल.