सुशीलकुमार नायक : सायबर गुन्हे जनजागृती कार्यशाळाचंद्रपूर : वाढत्या आधुनिक जीवन शैलीचे अविभाज्य अंग असलेले इंटरनेट, त्याद्वारे होणारे गुन्हे आणि यातून स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी इंटनेट वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे. त्याकरिताजागृत असणे, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग चंद्रपूर सुशीलकुमार नायक यांनी केले. एनडी हॉटेल चंद्रपूर येथे ‘सायबर गुन्हे व जनजागृती’, यावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नायक बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कम्युनिटी पोलिसिंगफकरिता नेहमीच समाजातील संवेदनशील विषयांवर जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सायबर सेल पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर, सवर समान महिला बहुउद्देशीय संस्था, बंगाली कॅम्प आणि भारती नेचरक्युअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील एनडी हॉटेल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रत्येक दैनंदिन गोष्ट आॅनलाईन पद्धतीने होत आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियाचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेट व सोशल मीडिया हे जीवनाचे एक मुख्य घटक म्हणून समोर येत आहेत. या सर्व साधनांचा वापर करताना सायबर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बांबीवर समाजामध्ये जागृती यावी आणि कोणीही वाईट कृत्यास बळी पडू नये, या दृष्टिकोनातून सोशल मीडियाचा उपयोग करताना काय करावे व काय करु नये, याबाबत सायबर क्राईम सेलतर्फे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यशाळेमध्ये ‘सायबर क्राईम’, या विषयांवर सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक विकास मुंढे यांनी माहिती सादर केली. मुजावर अली, इमरान शेख, राहुल पोंदे यांनी पॉवर पॉईन्ट प्रेझेटेंशनद्वारे फेसबुक, व्हॉट्सअॅप, बँक फ्रांड केसेस व इंटरनेट अॅडिक्शन आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच काही महत्त्वाच्या प्रकरणाबाबत माहिती दिली. श्रोत्यांनी मार्गदर्शन कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. भारती दुधानी, सुनिता सिंग, दुर्गा भगत, पुष्पा डे, कल्याणी मिश्रा आदींसह ज्येष्ठ नाग्रिक संघटनेचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण, महिला पुरुषांसह सर्व वयोगटातील श्रोता समुदाय उपस्थित होता. (प्रतिनिधी)
सायबर गुन्ह्यांविषयी जागृक असणे गरजेचे
By admin | Updated: February 22, 2017 00:50 IST