संगणक चोरट्यांच्या टोळीला अटक
By Admin | Updated: September 22, 2014 23:17 IST2014-09-22T23:17:21+5:302014-09-22T23:17:21+5:30
पोंभुर्णा तालुक्यातील घाटकूळ येथील महात्मा फुले विद्यालयातून संगणक साहित्य लांबविणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेने संगणक चोरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

संगणक चोरट्यांच्या टोळीला अटक
चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील घाटकूळ येथील महात्मा फुले विद्यालयातून संगणक साहित्य लांबविणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेने संगणक चोरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे यावर काही प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रफुल्ल रघुनाथ दुर्गे (२९), स्वप्नील आनंद अवधरे (२२), एक अल्पवयीन मुलगा (रा. मुधोली, चक ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) यांच्यासह बंटी ऊर्फ अनुराग नामदेव गजघाटे (२४ ) रा. इंदिरानगर चंद्रपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
रघुनाथ दुर्गे, स्वप्नील अवधरे यांच्यासह एकाने १६ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास घाटकूळ येथील महात्मा फुले विद्यालयातील संगणक साहित्य लंपास केले. चोरी केलेल्या साहित्याची किंमत १ लाख ९ हजार ३५० रुपये आहे. १७ सप्टेंबरला मुख्याध्यापक प्रफुल्ल भसारकर यांनी पोलिसांत याची तक्रार केली. ठाणेदार दिलीप डोलारे यांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान संशयास्पद फिरत असलेल्या प्रफुल्ल दुर्गे, स्वप्नील अवधरे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता तिघांनाही दहावीत प्रवेश घेण्याचे सांगून घाटकूळ येथील महात्मा फुले शाळेत दाखल झाले.
यातील एकाने कार्यालयात, तर दोघांनी शाळेतील खोल्यांची व परिसराची पहाणी करीत होते. शाळेची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी संगणक आणि अन्य साहित्य चोरुन नेले. ते साहित्य त्यांनी चंद्रपुरातील बंटी ऊर्फ अनुराग नामदेव गजघाटे याला विकल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहे. (नगर प्रतिनिधी)