घुग्घुस येथील सराफा दुकानात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:25 IST2021-02-07T04:25:50+5:302021-02-07T04:25:50+5:30
घुग्घुस : येथील जुन्या बसस्थानक बॅँक ऑफ इंडिया चौकातील मुख्य रस्त्यावरील श्री बालाजी सराफा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात ...

घुग्घुस येथील सराफा दुकानात चोरी
घुग्घुस : येथील जुन्या बसस्थानक बॅँक ऑफ इंडिया चौकातील मुख्य रस्त्यावरील श्री बालाजी सराफा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ६४ हजारांचे चांदीचे दागिने लंपास केले. मात्र तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने बाकीचे दागिने चोरट्यांच्या हाती लागले नाहीत. सदर घटना शनिवारी पहाटे घडली.
पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता तीन इसम तोंडावर कापड बांधून लोखंडी राॅडने कुलूप तोडल्याचे दिसून आले. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री सराफा दुकानदार सतीश रंगूवार घरी गेले. शनिवारी सकाळी दुकानाचे उघडण्याकरिता आले असता कुलूप तुटलेले असल्याने चोरी झाल्याचे उघडकीस आले. तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघा गोखरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे घटनास्थळी दाखल होऊन त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन अज्ञात इसम तोंडावर कापड बांधून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.