नाट्यनगरीत वाहतेयं चित्रपटांचे वारे

By Admin | Updated: April 8, 2016 00:56 IST2016-04-08T00:56:36+5:302016-04-08T00:56:36+5:30

सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर असलेल्या नवरगाव या नाट्यनगरीत मराठी चित्रपट ‘ताटवा’च चित्रिकरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणार आहे.

Theater of theater in Natyaagruti | नाट्यनगरीत वाहतेयं चित्रपटांचे वारे

नाट्यनगरीत वाहतेयं चित्रपटांचे वारे

गावात उत्साहाचे वातावरण : ‘ताटवा’चे चित्रिकरण आजपासून
नवरगाव : सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर असलेल्या नवरगाव या नाट्यनगरीत मराठी चित्रपट ‘ताटवा’च चित्रिकरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणार आहे. यामुळे गावात प्रचंड उत्साहाचे आणि फिल्मी वातावरण तयार झालेले आहे.
विदर्भाची नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरगावला आता चित्रनगरी म्हणून ओळखले जाईल, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ‘वडार’ समाजातील एका कल्पीत आणि कलावंत मुलीवर या चित्रपटाची कथा आधारलेली असून श्वास आणि तानी या नावाजलेल्या मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध कलावंत व अरुण नलावडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सुप्रसिद्ध नाट्यलेखक आणि चित्रकार सदानंद बोरकर हे या चित्रपटाचे कला दिग्दर्शक म्हणून काम बघतील. पटकथासंवाद महालींग कंठाळे, शैलेश ठवरे आणि सुरेश कांबळे यांनी लिहिली असून निर्मितीची संपूर्ण जबाबदारी शरयू पाझारे यांनी समर्थपणे उचलली आहे. त्यांच्या समवेत संजय कोंडबत्तुवार आणि महालींग कंठाळे हे सहनिर्माते आहेत. बॉलीवुडमधील ज्येष्ठ कॅमेरा दिग्दर्शक इमतीयाज बारगीर हे सर्व दृष्य आपल्या कल्पक नजरेतून कैद करतील. बी विशाल आणि महालिंग कंठाळे यांनी संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटासाठी सुरेश वाडकर, साधना सरगम, शंकर महादेवन, बेला शेंडे, आनंदी जोशी आणि जावेद अली या दिग्गज गायकांनी गाणी गायलेली आहेत.
वैष्णवी आर्टस प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या चित्रपटात स्वत: अरुण नलावडे व त्यांच्यासोबत कापूस कोंड्याची गोष्ट आणि रंगपतंगा या मराठी सिनेमातली प्रमुख तारका गौरी कोंगे, संजय सोज्वळ, शरयू पाझारे, सरिता घरडे, शितल राऊत, देवेंद्र दोडके, चिंधीबाजार फेम नुतन धवने आणि बालकलावंत म्हणून विक्रांत सदांनद बोरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सोबत या चित्रपटातून श्री व्यंकटेश नाट्य मंडळ नवरगावचे आणि जिल्ह्यातील आणि गावतील शंभरहून अधिक स्त्री-पुरुष कलावंत पडद्यावर झळकणार आहेत. सुप्रसिद्ध रंगभूषाकार बाबा खिरेकर आणि सुधाकर कोकाटे हे वेशभूषा व रंगभूषा करणार असून गावातील श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय तसेच कलादिग्दर्शक सदानंद बोरकर यांच्या घरातील कोपरे, कलात्मक झोपड्या आणि नवरगावच्या गल्लीबोळात आणि बाजारहाटात ‘ताटवा’च शुटींग होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Theater of theater in Natyaagruti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.