शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक प्रियकराच्या मदतीने कट रचून काढला पतीचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 23:34 IST

गुरुवारी मध्यरात्री घरात चोरटे शिरले. त्या चोरट्याने पतीची उशीने तोंड दाबून हत्या केली. सोन्याचे दागिने, सासूच्या गळ्यातील गोप व पैसे घेऊन पसार झाल्याची तक्रार मनोजच्या पत्नीने शहर पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तपासाचा छडा लावण्याचे निर्देश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढला. मात्र, बिंग फुटू नये म्हणून घरी चोरटा शिरला अन् पतीची हत्या करून दागिने घेऊन पसार झाल्याचा बनाव केला; परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावत मृतकाच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला २४ तासांत बेड्या ठोकल्या. स्वप्नील ताराचंद गावंडे (३४, रा. घुटकाळा तलाव हनुमान चौक, चंद्रपूर) असे अटक झालेल्या प्रियकराचे नाव आहे. मनोज रमेश रासेकर (४५, रा. विश्वकर्मा चौक बालाजी वार्ड, चंद्रपूर) असे मृतकाचे नाव आहे.गुरुवारी मध्यरात्री घरात चोरटे शिरले. त्या चोरट्याने पतीची उशीने तोंड दाबून हत्या केली. सोन्याचे दागिने, सासूच्या गळ्यातील गोप व पैसे घेऊन पसार झाल्याची तक्रार मनोजच्या पत्नीने शहर पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तपासाचा छडा लावण्याचे निर्देश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास केला असता मृतकाच्या पत्नीचे तिच्या मुलीच्या शाळेतील शिक्षकासोबत प्रेमसंबंध असल्याची बाब समोर आली; परंतु या प्रेमसंबंधात मृतक आडवा येत असल्याने त्याचा काटा काढण्याचा दोघांनी ठरवले, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. 

असाही रचला होता कटमनोज रासेकर हा १५ दिवसांपूर्वी आजारी पडला होता. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. ही संधी साधून त्यांच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पती मनोजला संपवून तो आजारपणाने मरण पावला, असा बनाव निर्माण करण्याचा कट रचला. गुरुवारी तिने प्रियकर शिक्षकाला बोलावून आजारी मनोजचे तोंड उशीने दाबून त्याची हत्या केली. यावेळी झालेल्या झटापटीत मनोजची वयोवृद्ध           आई जागी झाली. तिलासुद्धा जीवे मारण्याची धमकी देऊन मनोजच्या पत्नीने चोर आल्याचा देखावा निर्माण केला. घरातील कपाट उघडून त्यातील कपडे अस्ताव्यस्त          फेकले. सासूला गळ्यातील सोन्याची पोत काढून मारेकरी शिक्षकाला देण्यास भाग पाडले. मारेकरी पळून गेल्यानंतर ही घटना मनोजच्या नातेवाइकांना अवगत केली. त्यानंतर शहर पोलिसांत खोटी तक्रार केली होती. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक     बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पोह. संजय अतकुलवार, संतोष एलकुलरवार, नितीन रायपुरे, रवी पंधरे, सायबरचे मुजावर अली, अमोल सावे, वैभव पत्तीवार, उमेश रोडे आदींनी        केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस