शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

भारताच्या त्रिकोणमितीय भूमापनाची सुरूवात करणाऱ्या एका साहसी सर्वेक्षकाची गोष्ट!

By राजेश मडावी | Updated: May 20, 2023 18:00 IST

Chandrapur News कर्नल विल्यम लॅम्बटन या साहसी सर्वेक्षकाने दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून १० एप्रिल १८०२ राेजी भारताच्या त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात मद्रास जवळील थॉमस पर्वतापासून केली.

राजेश मडावीचंद्रपूर : भूमी अभिलेख विभागात आता अत्याधुनिक साधनांचा वापर वाढला. मात्र, या विभागाची पाळेमुळे ब्रिटिश काळात रुजली. कर्नल विल्यम लॅम्बटन या साहसी सर्वेक्षकाने दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून १० एप्रिल १८०२ राेजी भारताच्या त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात मद्रास जवळील थॉमस पर्वतापासून केली. चंद्रपुरात पोहोचून तिथून सर्वाेच्च पर्वताकडे जाण्याच्या मोहिमेदरम्यान लॅम्बटनचे हिंगणघाट येथे निधन झाले. त्यांचा हा थरारक प्रवास व सर्वेक्षणाची उपयुक्तता पटवून देण्यासाठी ‘कर्नल विल्यम लॅम्बटन’ हा ग्रंथ मराठीत लिहिल्याची माहिती चंद्रपूरचे लेखक प्रा. डॉ. योगेश दुधपचारे यांनी शनिवारी ‘लोकमत’ला दिली. 

कर्नल विल्यम लॅम्बटन हे झिरो माईलचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या द्विशताब्दी स्मृतिदिन समारोहानिमित्त हिंगणघाट येथे प्रा. डॉ. योगेश दुधपचारे यांच्या ग्रंथाचे प्रकाशन झाले होते. ग्रंथ लेखनाची कल्पना कशी सुचली याबाबत डॉ. दुधपचारे म्हणाले, जगभरात कर्नल विल्यम लॅम्बटनच्या ब्रिटिशकालीन भारतातील भूमापन योगदानाबाबत चर्चा होत असते. भारतीय भूमापनाच्या इतिहासातील कर्नल लॅम्बटन हे मानबिंदू असून भारतीय उपखंडाच्या भूमापनाचे खरे श्रेय त्यांनाच जाते. मात्र, भारताच्या त्रिकोणमितीय भूमापनाचे कार्य करताना हिंगणघाट येथे २० जानेवारी १८२३ रोजी निधन झालेल्या या महान सर्वेक्षकाबाबत मराठी विश्वात मूलगामी ग्रंथसंपदा उपलब्ध नाही. हे माझ्या लक्षात आले.

जॉर्ज एव्हरेस्ट व बरेच काही...कर्नल लॅम्बटन यांच्या मृत्यूनंतर भूमापनाची ही जबाबदारी जॉर्ज एव्हरेस्ट यांच्यावर आली. कर्नल लॅम्बटन यांनी सुरू केलेल्या कामाला ४० वर्षानंतर त्यांनी मूर्त रूप दिले. जॉर्ज एव्हरेस्ट यांच्याच नावावरून जगातील सर्वोच्च उंचीच्या पर्वताला ‘एव्हरेस्ट पर्वत’ हे नाव मिळाले. याशिवाय भारतीय सर्वेक्षण इतिहासाची दूर्मिळ माहिती या ग्रंथात नोंदविल्याचे प्रा. दूधपचारे यांनी सांगितले.

मराठीतील उणीव काही अंशी दूरमहाराष्ट्रासह भारतातील सर्व भूमिअभिलेख विभागाच्या कार्यालयात कर्नल विल्यम लॅम्बटनचे छायाचित्र हमखास पाहायला मिळते. पण, लॅम्बटनच्या कार्याचे स्वरूप, वैशिष्ट्ये व सामाजिक उपयोगिता काही अधिकाऱ्यांनाही नीटपणे नागरिक व विद्यार्थ्यांना समजावून सांगता येत नाही. या ग्रंथाने मराठी ज्ञानविश्वातील ही उणीव काहीअंशी दूर होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

समाजाभिमुख संशोधनशिक्षण, समाजकारण व पर्यावरणाच्या विविध आघाड्यांवर मी सक्रीय आहे. पीएचडी अथवा तत्सम पदवी मिळाली की स्वकोषातच रमण्याची शक्यता अधिक असते. माझ्या मनोपिंडाला हे कदापि पटणारे नाही. त्यामुळे व्यापक समाजमनाशी नाळ जोडावी, विद्यार्थी व नागरिकांच्या ज्ञानकक्षा रुंदाव्यात,  भूमी अभिलेखाच्या भारतीय पाऊलखुणा कळाव्यात, यासाठी हे संशोधनात्मक पुस्तक मराठीत लिहिल्याचे प्रा. दूधपचारे यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक