शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 'या' गावात पोहोचली लालपरी; ग्रामस्थांनी नारळ फोडून केली पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 12:30 IST

भद्रावती तालुक्यातील विसलोन येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एस.टी. महामंडळाची लालपरी पोहोचली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरणचालक-वाहक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार

संदीप झाडे

कूचना (चंद्रपूर) : देशभरात विकासाच्या दृष्टीकोनातून विविध कार्य सुरू आहेत. मेट्रोपासून-बुलेट ट्रेनपर्यंतची सेवा जनतेला उपलब्ध करून देण्याचं कार्य प्रगतीपथावर आहे. पण, देशातील काही असेही भाग आहेत जिथे ट्रेन तर सोडाच साधी बससेवाही उपलब्ध नाही. अशाच एका गावात शनिवारी एसटी महामंडळाची बस पहिल्यांदाच पोहोचली. तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरे आहे. भद्रावती तालुक्यातील विसलोन हे आडमार्गातील गाव. वरोरा आगारातून १२ कि.मी. अंतरावर असलेल्या विसलोन गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लालपरी पोहोचली. पहिल्यांदा बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थ आणि खास करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

भद्रावती तालुक्यातील विसलोन, पळसगाव, माजरी वस्ती या भागातील गावांना या बसमुळे मोठा आधार मिळाला आहे. या गावांना वर्षानुवर्षे येथील प्रवाशांना वैयक्तिक व खासगी वाहनांशिवाय इतर प्रवाशांचे कुठलेही साधन नव्हते. त्यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी वरोरा जाण्यासाठी दमछाक होत असे. तसेच बस पकडायची असल्यास नंदोरी किंवा कुचना येथे जावे लागत होते. त्यासाठी सहा कि.मी.ची पायपीट करावी लागत होती. विशेषतः चौथ्या वर्गानंतर विद्यार्थ्यांना नंदोरीला पायी जावे लागायचे. मात्र या गावासाठी प्रवीण सूर यांच्या प्रयत्नातून बस चालू झाल्याने या गावातील जनतेच्या आनंदाला पारावर उरला नाही. विसलोन गावात पहिल्यांदा आलेल्या आगार व्यवस्थापक, चालक-वाहकांचे शाल श्रीफळ सत्कार केला तर बसचीही नारळ फोडून पूजा केली.

तांत्रिक बाबी तपासल्या

सध्या तांत्रिक बाबी तपासण्यासाठी शनिवारी वरोरा बसस्थानकातून बस वरोरा-नंदोरी-विसलोन मार्गावर धावली. सदर बस गुरुवारपासून नियमित सुरू होणार असून सकाळी ७,१० दुपारी १ वाजता व सायं.५ वाजता अशा चार फेऱ्यांमध्ये धावणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली.यावेळी अन्य गावकरी महिलावर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच विसलोन गावात बस आली. या गावात ये-जा करण्यासाठी कुठलेच साधन नव्हते. मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी सहा किलोमीटर पायदळ पायपीट करावी लागायची. मात्र, बस सुरू झाल्याने गावकऱ्यांचा आनंद आहे.

-प्रवीण सूर, माजी जि. प. सदस्य, माजरी

टॅग्स :state transportएसटीRural Developmentग्रामीण विकासchandrapur-acचंद्रपूरSocialसामाजिक