शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मातृ दिनाच्या दुसऱ्याच दिवशी मातृप्रेमाची प्रचिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:00 IST

तिने पाठलाग करून बिबट्याला गाठले. तिचा पोटचा गोळा बिबट्याच्या जबड्यात होता. हृदयाचे ठोके चुकविणारे दृश्य बघून आई जराशीही डगमगली नाही. तिने एकटीने पूर्ण शक्ती एकवटून शूरवीरपणे केवळ काठी हातात घेऊन बिबट्याशी लढा दिला. मातेच्या या आक्रमकतेने नरभक्षी बिबट्या चिमुकलीला सोडून पसार झाला. तिने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकलीला उचलून अंगणात आणले.

अजिंक्य वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कदुर्गापूर : मोलमजुरीच्या कामात काबाडकष्ट करून थकून भागून घरी परतलेली माता नुकतीच स्नानाला गेली होती. तोच अंगणात बसलेल्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला. तिने न डगमगता शूरवीरपणे आपल्या जिवाची पर्वा न करता  बिबट्याशी लढा दिला व बिबट्याच्या जबड्यातून आपल्या पोटच्या गोळ्याची सुटका केली. या शूर मातेने मातृ प्रेमाखातर केलेल्या कामगिरीचा मातृ दिनाच्या दुसऱ्याच दिवशी मातृ प्रेम काय आहे हे  दाखवून  मोठा संदेश दिला आहे. ज्योती जगजीवन कोपुलवार असे या मातेचे नाव आहे.आराध्या (८) व आरक्षा कोपुलवार (अडीच वर्षे) या दोघीही चिमुकल्या बहिणी अंगणात बसून जेवण करीत होत्या. त्यांची आई बाजूलाच बाथरुममध्ये स्नान करत होती. आरक्षाचे जेवण झाल्यानंतर तिथेच खेळत होती. अंगणात लाईटचा लख्ख प्रकाश होता. उजेडातच त्या परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने  आरक्षावर झडप घेतली. मानेला पकडून फरफटत काही अंतरावर घेऊन गेला. आई आई म्हणून आरक्षा जोरजोराने किंचाळत होती. स्नान करत असलेली आई क्षणाचाही विलंब न करता काठी घेऊन त्या दिशेने धावत निघाली. तिने पाठलाग करून बिबट्याला गाठले. तिचा पोटचा गोळा बिबट्याच्या जबड्यात होता. हृदयाचे ठोके चुकविणारे दृश्य बघून आई जराशीही डगमगली नाही. तिने एकटीने पूर्ण शक्ती एकवटून शूरवीरपणे केवळ काठी हातात घेऊन बिबट्याशी लढा दिला. मातेच्या या आक्रमकतेने नरभक्षी बिबट्या चिमुकलीला सोडून पसार झाला. तिने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकलीला उचलून अंगणात आणले. डाव्या बाजूचा गाल व मानेवर बिबट्याच्या दाताच्या खोलवर जखमा झाल्याने चिमुकली     रक्तबंबाळ होऊन आईसुद्धा तिच्या रक्ताने न्हाऊन निघाली होती. या मातेच्या मातृप्रेमाने पोटच्या गोळ्याचा जीव वाचला.

संकटाचा केला सामनाआंतरराष्ट्रीय मातृ दिनाच्या दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनेवरून आईचे मुलाप्रती असलेल्या जिवापाड प्रेमाची प्रचिती आली. तिने आपल्या प्राणाची बाजी लावत चिमुकलीला बिबट्याच्या जबड्यातून सोडविले. मोलमजुरी करणारे हे गरीब कुटुंब आहे. या आईने ओढवलेल्या संकटाचा मोठ्या शिताफीने सामना केला.  याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेleopardबिबट्या