शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आजवर दिव्याच्या साहाय्याने काढत होते रात्र; 'त्यांच्या' नशीबी आलेला अंधार कायमचा होणार दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 14:46 IST

कुळसंगेगुड्यातील विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी घटक योजनेमधून १७ लाख ४८ हजार ८६८ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले असून, आदिवासी बांधवांच्या घरात प्रकाश पोहोचविण्याचे काम महावितरणद्वारा सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपहाडावरील दुर्लक्षित कुळसंगेगुड्याला ५ वर्षाच्या प्रयत्नानंतर मिळणार वीज

जिवती (चंद्रपूर) : तालुक्यापासून आठ किलोमीटर दूर वसलेल्या कुळसंगेगुडा येथे नवीन विद्युत जोडणीचे १७ लाख ४८ हजार ८६८ रुपये किमतीचे काम सुरू झाले आहे. यामुळे मागील पाच वर्ष दिव्याच्या सहाय्याने रात्र काढलेल्या कुळसंगेगुडावासीयांच्या नशिबी आलेला अंधार कायमचा दूर होणार आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर या यंत्रणेच्या देखरेखीत विद्युत विकास या उपशीर्षांतर्गत कुळसंगेगुडा गावात नवीन विद्युत जोडणीसाठी तांत्रिक मान्यता मिळाली असून, प्रशासकीय किंमत १७ लाख ४८ हजार ८६८ रुपयांचे काम जिल्हाधिकारी यांच्या प्रशासकीय मान्यता व निधी वितरण आदेशानुसार मंजूर आहे. यासाठी कैलास राठोड यांनी सतत पाठपुरावा केला होता, हे विशेष.

कुळसंगेगुडा येथे २१ आदिवासी कुटुंब वास्तव्याला आहेत. मागील पाच वर्षांपासून गावात विद्युत पुरवठा व्हावा म्हणून गावकऱ्यांच्यावतीने अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु, त्याची कोणाकडूनही दखल घेण्यात आली नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास राठोड यांनी कुळसंगेगुडा येथील जनतेच्या समस्या जाणून घेऊन काम मंजूर होईपर्यंत त्याचा सतत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. त्यांच्या प्रयत्नाने कुळसंगेगुडा गाव कायमचा अंधारमुक्त होणार आहे.

आदिवासी घटक योजनेतून मिळाला निधी

कुळसंगेगुड्यातील विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी घटक योजनेमधून १७ लाख ४८ हजार ८६८ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले असून, आदिवासी बांधवांच्या घरात प्रकाश पोहोचविण्याचे काम महावितरणद्वारा सुरू करण्यात आले आहे.

मागील पाच वर्षांपासून आम्ही वारंवार विद्युत जोडणीसाठी अर्ज, निवेदने दिली. परंतु, कोणीही दखल घेतली नाही. गावात वीज नसल्याने २१ कुटुंबांनी खायच्या तेलाचे दिवे लावून एवढ्या रात्री काढल्या. कैलास राठोड यांच्यामुळे आमच्या गावात वीज येणार आहे.

- अंबाजी लिंगू कोटनाके, गाव पाटील, कुळसंगेगुडा

टॅग्स :SocialसामाजिकelectricityवीजRural Developmentग्रामीण विकास