शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इरई धरणाचे पाच दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 05:00 IST

जिवती-रोडगुडा रस्त्यावर चार फूट पाणी वाहत असल्यामुळे काहीजण दोन तास अडकले होते. पुरामुळे जिवती ते वणी, जिवती ते येल्लापूर मार्गावरील शाळा उघडल्या नाहीत. माणिकगड किल्ल्याच्या घाटात झाडे कोसळल्याने गडचांदूर-जिवती, भारी ते शंकरपठार मार्ग बंद आहे. हिमायतनगर येथील गजानन डावले, आनंदगुडा येथील माधव गोरे आदींसह भारी, बाबापूर, असापूर व पहाडावरील अनेक गावांतील पिकांची मोठी हानी झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सतत पाच दिवसांपासून पाऊस धो-धो बरसत असल्याने नदी-नाल्यांना पूर आला. पावसाच्या माऱ्याने अनेकांची पडझड झाली तर शेकडो एकर शेती पुराच्या पाण्याखाली आली. गावांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जिवती ते वणी, जिवती-येल्लापूर मार्गावरील शाळाच भरल्या नाहीत. नाल्याला पूर आल्याने वरोरा, बल्लारपूर, मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, चिमूर, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना तालुक्यांतील अनेक रस्ते बंद झाले. मंगळवारी दिवसभर संततधार सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तीन लाखांचे डेकोरेशनचे साहित्य पाण्यातमूल : शहरातील श्रमिक नगरातील शुभम अशोक पोलोजवार या युवकाच्या घरात पाणी शिरल्याने   डेकोरेशनचे इलेक्ट्रिक साहित्य खराब होऊन सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले. बेरोजगारीवर मात करण्यासाठी या युवकाने बँकेतून कर्ज काढून स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. शहरातील सर्वच वस्त्या जलमय झाल्या असून, काही घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. 

जिवती-वणी मार्ग ठप्पजिवती : जिवती-रोडगुडा रस्त्यावर चार फूट पाणी वाहत असल्यामुळे काहीजण दोन तास अडकले होते. पुरामुळे जिवती ते वणी, जिवती ते येल्लापूर मार्गावरील शाळा उघडल्या नाहीत. माणिकगड किल्ल्याच्या घाटात झाडे कोसळल्याने गडचांदूर-जिवती, भारी ते शंकरपठार मार्ग बंद आहे. हिमायतनगर येथील गजानन डावले, आनंदगुडा येथील माधव गोरे आदींसह भारी, बाबापूर, असापूर व पहाडावरील अनेक गावांतील पिकांची मोठी हानी झाली. 

पोथरा नदीचे पाणी शेतातवरोरा : पोथरा नदीचे पाणी अनेकांच्या शेतात शिरले. वरोरा-वणी महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने सुरक्षा भिंत बांधल्यामुळे पाणी निघण्याचा मार्ग बंद होऊन शेती पाण्याखाली आली. हीच  स्थिती वरोरा-चिमूर मार्गालगतच्या शेतीची झाली. तालुक्यातील २५ पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. माढेळी, वडनेर मार्ग नागरी हिंगणघाट एमआयडीसी दहेगाव, खांबाळा, नागरी, हिंगणघाट व बोडखा मार्गावरील पुलावरून पूर असल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूक बंद होती. 

वेकोलिच्या ढिगाऱ्यांनी घातवेकोलिच्या ढिगाऱ्यांमुळे चंद्रपूर तालुक्यातील चांदसुर्ला गावात मंगळवारी अचानक पाणी शिरल्याने हाहाकार उडाला. घरातील वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांना माहिती मिळताच त्यांनी स्वीय सहायक व विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला गावात पाठविले. 

बल्लारपूर तालुक्यात ५० घरांची पडझड विसापूर : बल्लारपूर तालुक्यात बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ५० वर घरांची पडझड झाली त्यामुळे गरिबांचे संसार उघड्यावर आले आहे. बल्लारपूर शहरात अतिवृष्टीने विविध वार्डांत १० तर विसापुरात १० कुटुंबाच्या घरांची पडझड झाली. बामणी (दुधोली) येथे २, चारवट येथे ५, नांदगाव (पोडे) ५, कोठारी येथे १०, मानोरा येथे ३, इटोली येथे २ तर गिलबिली ग्रामपंचायत हद्दीत ३ जणांचे घरे अतिवृष्टीने पडल्याची माहिती आहे. अतिवृष्टीने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. अतिवृष्टीने तालुक्यात ५० वर घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. बल्लारपूर तालुक्यात ५० वर घरांची पडझड झाली. काहींच्या घरांचे अंशत: नुकसान झाले. तर काहींचे निवारा हिरावला आहे. तलाठ्यामार्फत पंचनामे सुरु आहेत. 

 

टॅग्स :Damधरणfloodपूर