शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरच... तरुणीला निर्वस्त्र करून मुंडकेच केले धडावेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 10:36 IST

मृत युवतीच्या बाजूला मोबाइल चार्जर, हेडफोन, चावी, तरुणीची जुती व चिल्लर पैसे असे आढळून आले, परंतु मुंडके कुठेच आढळून आले नाही.

ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्यातील घटना शिर मात्र कुठेच आढळले नाही

भद्रावती (चंद्रपूर) : येथील गवराळा परिसरातील शेतशिवारात अंदाजे २५ वर्षीय तरुणीचे मुंडके नसलेले निर्वस्त्र धड शेतशिवारात आढळले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेची माहिती पोलिसांना होताच, पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. या तरुणीवर अत्याचार करून तिचा खून केला किंवा तिचा नरबळी अशा चर्चांना उधाण आले आहे.

गवराळा शेतशिवारात ढेंगळे यांचे शेत आहे. त्यांच्या बाजूला झाडे यांचे शेत आहे. अमोल झाडे हे पहाटे शेतीच्या कामासाठी गेले असता, त्यांना ढेंगळे यांच्या शेतात निर्वस्त्र अवस्थेत तरुणीचा मुंडके नसलेला मृतदेह दिसला. त्यांनी या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता. मृत युवतीच्या बाजूला मोबाइल चार्जर, हेडफोन, चावी, तरुणीची जुती व चिल्लर पैसे असे आढळून आले, परंतु मुंडके कुठेच आढळून आले नाही. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, या घटनेबाबत तर्कवितर्क काढण्यात येत आहेत.

अत्याचार करून हत्या केल्याची शंका 

तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळला. आरोपीने मुंडके धडापासून वेगळे केले. तरुणीच्या अंगावर कोणताही दागिना नव्हता, तसेच पायात पैंजण व हातात बांगड्या वगैरे नव्हत्या. या तरुणीवर अत्याचार करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिचे मुंडके धडापासून वेगळे करून घटनास्थळापासून नष्ट केले असावे, अशी शंका पोलिसांकडून उपस्थित केली जात आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक कुलकर्णी, ठाणेदार गोपाल भारती, फॉरेन्सिक टीम, फिंगर टीम, एक्स्पर्ट पथक दाखल झाले असून, वेगवेगळ्या दिशेने तपास करीत आहेत.

ओळख पटली नाही

सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. मात्र, आतापर्यंत युवतीची ओळख पटू शकली नाही. परिसरातील पाेलीस ठाण्यात कोणत्याही तरुणीची मिसिंगबाबत तक्रार आली आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला आहे. या प्रकारात अत्याचार करून हत्या केली आहे की, नरबळीचा प्रकार आहे, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूchandrapur-acचंद्रपूरPoliceपोलिस