शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

चूक कंत्राटदाराची, शिक्षा जनतेला ; पाणीपुरवठ्याचा प्रश्न पेटला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:19 IST

भिकेश्वर येथील वास्तव : कंत्राटदाराच्या चुकीचा पालिकेला फटका

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नगरपरिषद अंतर्गत भिकेश्वर येथे रस्ता व नालीचे काम करताना भिकेश्वरला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली. याला आता दोन महिन्यांचा कालावधी होत आहे. मात्र पाइपलाइन दुरूस्त करण्यात न आल्याने भिकेश्वरचा पाणीपुरवठा दोन महिन्यांपासून बंद आहे.

नगरोत्थान योजनेंतर्गत नागभीड नगरपरिषद क्षेत्रात अनेक कामे सुरू आहेत. असेच नाली व सिमेंट रस्त्याचे बांधकाम भिकेश्वर येथेही सुरू आहे. मात्र हे काम करीत असताना कंत्राटदाराने सावधानता न बाळगल्याने भिकेश्वरला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची पाइपलाइन फुटली. पाइपलाइन मोठ्या प्रमाणावर फुटल्याने भिकेश्वर प्रभागाचा पाणीपुरवठा बंद झाला. पाणीपुरवठा बंद होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी होत असला तरी अद्यापही पाइपलाइन दुरुस्त करण्यात आली नाही. परिणामी महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. 

टँकरद्वारे पाणीपुरवठापाइपलाइन फुटल्याने भिकेश्वर येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. गावकऱ्यांनी संताप व्यक्त करताच नगरपरिषदेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र अपुरे पाणी मिळत असल्याची महिलांची ओरड आहे. 

ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईउन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाईपलाईन फुटली आहे. मात्र अद्यापही दुरुस्ती केली नसल्याने आता पावसाचे दिवस सुरु झाले असतानाही नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. कंत्राटदारा चूक असतानाही नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाईपलाईन दुरुस्त करून नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.

काँग्रेसने वेधले लक्षभिकेश्वर येथे निर्माण झालेल्या या समस्येकडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर यांनी नगरपरिषदेस निवेदन देऊन लक्ष वेधले. या निवेदनात कंत्राटदाराने मनमानीपणे काम केल्यामुळेच पाइपलाइन फुटली आहे. यात परिषदेचे नुकसान झाले आहे. नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करावी, चूक कंत्राटदाराची आणि पाणीपुरवठा करण्याचा भुर्दंड नगरपरिषदेवर बसला. त्यामुळे हा खर्च कंत्राटदारांकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात वारजूकर यांनी केली आहे. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, माजी नगरसेवक प्रतीक भसीन, माजी नगरसेवक नरेंद्र हेमणे उपस्थित होते.  

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात