शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

चंद्रपुरात वातावरण तापले, मुनगंटीवार प्रचंड अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 12:02 IST

संधी कॅश करण्यासाठी काँग्रेस सरसावली

लोकमत न्यूज नेटवर्क  चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी १९८४ च्या शीख दंगलीवरून भाऊ-बहिणीच्या नात्याचे उदाहरण देऊन केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच अडचणीत आणणारे ठरत आहे. काँग्रेसने ही नामी संधी हेरून आपल्या प्रचारात या वक्तव्याचा आधार घेत मते मागायला सुरुवात केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मतदार काँग्रेसच्या या प्रचाराचे मतात रूपांतर करतात की भाजपची बाजू समजून मतदान करतात हे बघण्यासारखे आहे. 

चंद्रपूरच नव्हे, तर वर्धा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवारही याचा पुरेपूर लाभ घेत असल्याची चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांची सोमवारी चंद्रपुरात सभा होती. यामध्ये मुनगंटीवार यांनी काँग्रेस राजवटीत झालेल्या शीख दंगलीचा संदर्भ घेऊन काँग्रेसवर टीका केली. दंगलीचे शाब्दिक चित्रण करताना त्यांनी भाषणातून भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासण्याचे काम काँग्रेसने केले, असा आरोप केला. या भाषणानंतर काहींनी सुरुवातीचे भाषण गहाळ करून भाऊ-बहिणीचा उल्लेख असलेल्या वक्तव्याची क्लिप तयार करून ती व्हायरल केली. त्यानंतर मुनगंटीवार यांच्यावर शाब्दिक चिखलफेक सुरू झाली असून, वातावरण तापले आहे. 

नागपूर पोलिसात तक्रारयाप्रकरणी काँग्रेसचे डॉ. गजराज हटेवार यांनी मुनगंटीवार यांच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली. चंद्रपूर पोलिसांकडे हे प्रकरण पाठविल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी सांगितले. 

प्रचारात विकासाचा मुद्दा गौणnमुनगंटीवारांच्या एका वक्तव्यामुळे अचानक चंद्रपूर मतदारसंघाच्या निवडणुकीतून विकासाचा मुद्दा बाजूला फेकला गेला आहे. जो तो या वक्तव्यावरच चर्चा करताना दिसत आहे.nहे वक्तव्य प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेसने आपली  सर्व यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी कामाला लावली आहे. nदुसरीकडे भाजप डॅमेज कंट्रोलच्या कामाला लागला आहे. भाषणाची पूर्ण क्लिप व्हायरल करून विकासाचा मुद्दा रेटत वादग्रस्त वक्तव्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारchandrapur-pcचंद्रपूरElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४