दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी जेरबंद

By Admin | Updated: March 9, 2016 01:56 IST2016-03-09T01:56:34+5:302016-03-09T01:56:34+5:30

येथील वडगाव परिसरातील डॉ.आंबेडकर भवन परिसरात रात्रीच्यावेळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चौघांना जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे.

Terrorist gang raid | दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी जेरबंद

दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी जेरबंद

रामनगर पोलिसांची कारवाई : दोन कुऱ्हाडी, मिरची पावडर जप्त
चंद्रपूर: येथील वडगाव परिसरातील डॉ.आंबेडकर भवन परिसरात रात्रीच्यावेळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चौघांना जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील तिघेजण फरार होेण्यात यशस्वी झालेत. त्यांचाही शोध घेतला जात आहे.
सोमवारी पहाटे काही युवक अंधाराचा फायदा घेत वडगाव परिसरातील आंबेडकर भवनाच्या मागील भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनिय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. दरम्यान, पोलिसांचा ताफा जवळ येताच, त्यातील तिघाजणांनी मोटरसायकलने तेथून धूम ठोकली. मात्र त्यातील चौघेजण पोलिसांच्या तावडीत सापडले. पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे दोन लोखंडी कुऱ्हाड, लोखंड कापण्याची आरी, मिरची पावडर, कटर ब्लेड, मोटारसायकल आदी साहित्य जप्त करण्यात आले.
याप्रकरणी रामनगर पोलिसांनी भांदवि ३९९, ४०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, ९ मार्चपर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक होमराजसिंह राजपूत व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगरचे ठाणेदार संपत चव्हाण, संजय भारती, मुटेकर, मुंदे, मत्ते, नाईक, कामटकर यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)

Web Title: Terrorist gang raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.